मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diwali 2021: दिवाळीत पणती लावायची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत?

Diwali 2021: दिवाळीत पणती लावायची योग्य पद्धत माहिती आहे का? कुठल्या दिशेला असावी ज्योत?

Diwali 2021: दिवाळीनिमित्त घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत. कुठल्या दिशेला दिव्याची वात असणं चांगलं, कुठल्या तेलाचा वापर योग्य?

Diwali 2021: दिवाळीनिमित्त घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत. कुठल्या दिशेला दिव्याची वात असणं चांगलं, कुठल्या तेलाचा वापर योग्य?

Diwali 2021: दिवाळीनिमित्त घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगितले आहेत. कुठल्या दिशेला दिव्याची वात असणं चांगलं, कुठल्या तेलाचा वापर योग्य?

    नवी दिल्ली, 4  नोव्हेंबर: दसरा ( Dussehra ) संपला, की दिवाळी ( Diwali 2021) जवळ आल्याची चाहूल लागते. आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी ( festivals) दिवाळी हा सर्वांत मोठा सण. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. वसुबारसेपासून दिवाळीला प्रारंभ झाला असून, यंदा 6 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या दीपोत्सवासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. सुख-समृद्धीचे प्रतीक असलेला हा सण साजरा करीत असताना घरात व अंगणात दिवे लावताना, विद्युत रोषणाई करताना वास्तुशास्त्रानुसार थोडी काळजी घेण्याची गरज आहे. 'आज तक'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या अमावास्येला गुरुवारी (4 नोव्हेंबर) दिवाळी साजरी केली जाईल. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात दीपप्रज्ज्वलनाचं विशेष महत्त्व आहे. तसंच घरात लक्ष्मी देवीच्या (Lakshmi devi puja) आगमनासाठी प्रत्येक जण घराला विद्युत रोषणाईसुद्धा करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी देवीची आणि श्री गणेशाची ( Lord Ganesha) पूजा केली जाते. या दिवशी घरात कुठेही अंधार नसावा अन्यथा लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही, असं मानलं जातं. अशीच श्रद्धा दिवा लावण्याची पद्धत आणि घराला करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईसोबतसुद्धा जोडली आहे. घरात, अंगणात लावण्यात येणारे दिवे शास्त्रानुसार योग्य पद्धतीने न लावल्यास ते शुभ मानलं जात नाही.

    दिवाळीच्या काळात घरात विद्युत रोषणाई करण्याचा विचार करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला कोणत्या रंगाची रोषणाई करावी हे समजून घ्या. घराची सजावट करताना रंगीबेरंगी लाइटिंगच्या माळा वापरल्या जात असल्या तरी या काळात रंगांची काळजी घेतली तर ते शुभ ठरतं.

    साप्ताहिक राशीभविष्य : तुमची दिवाळी कशी जाणार पाहा

    पूर्व दिशेला लाल, पिवळा आणि केशरी प्रकाश पडेल, असं लायटिंग शुभ राहील. पश्चिम दिशेला गर्द पिवळा, केशरी आणि गुलाबी प्रकाश पडेल, असं लायटिंग करावं. उत्तर दिशेला निळा, पिवळा आणि हिरवा प्रकाश पडेल, असं लायटिंग करता येईल. पांढरा, जांभळा आणि लाल प्रकाश पडेल, असं लायटिंग दक्षिण दिशेला करावं.

    मध आणि लवंगा एकत्र खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे; असे करा मिश्रण

    - दिव्याचं तोंड दक्षिणेकडे करून कधीही दिवा लावू नये. कारण ते अशुभ आहे. दक्षिण दिशा यमाची असते. केवळ धनत्रयोदशीदिनी दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो. त्याला यमदीपदान असं म्हणतात.

    - दिवाळीला शुद्ध तुपाचे दिवे लावल्यास घरात समृद्धी येते, असं मानलं जातं.

    - दिवे लावण्यासाठी कधीही सूर्यफुलाचं तेल वापरू नये.

    - दिव्याची वात इतकी लांब असावी की जेणेकरून ज्योत दिव्याच्या मध्यभागी जाणार नाही.

    - दिवे लावण्याची सुरुवात नेहमी देवघरातून करावी.

    - दिवाळीच्या दिवशी घरात लक्ष्मी आणि गणेशाचं स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत.

    - दिवाळीमध्ये महत्त्वाचं असणारं लक्ष्मीपूजन उद्या, गुरुवारी होणार आहे. लक्ष्मीपूजन करताना घरात, अंगणात दीपप्रज्ज्वलन करताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. योग्य पद्धतीने दिवे लावल्यास फायदा होतो व लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.

    First published:

    Tags: Culture and tradition, Diwali 2021, Diwali-celebrations, Eco friendly Diwali