मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Honey and Clove Benefits : मध आणि लवंगा एकत्र खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे; असे करा मिश्रण

Honey and Clove Benefits : मध आणि लवंगा एकत्र खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे; असे करा मिश्रण

Honey and Clove Benefits in Winter: मध आणि लवंग एकत्र वापरल्यास त्यांचे फायदे दुप्पट होतात. या दोन्ही गोष्टी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांनी समृद्ध आहेत, त्यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी त्या खूप फायदेशीर आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : लवंग (Clove) आणि मधाचे (Honey) आरोग्यासाठी असलेले फायदे तुम्ही ऐकलेच असतील. अनेकवेळा तुम्ही औषधांसाठी मध आणि लवंगाचा वेगळा-वेगळा वापर केला असेल. पण, मध आणि लवंग एकत्र वापरल्यास त्यांचे फायदे दुप्पट होतात. या दोन्ही गोष्टी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांनी समृद्ध आहेत, त्यामुळे काही आरोग्य समस्या दूर करण्यासाठीही त्या खूप फायदेशीर आहेत. हिवाळा सुरू होत आहे, अशा परिस्थितीत मध आणि लवंग एकत्र वापरल्यास त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. आज आपण मध आणि लवंग एकत्र खाण्याचे फायदे (Honey and Clove Benefits in Winter) जाणून घेऊया.

खोकला आणि घसा खवखवण्यावर आराम

हिवाळ्यात (Winter) खोकला आणि घसा खवखवणे ही खूप सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही लवंग आणि मधाची मदत घेऊ शकता. यासाठी तीन लवंग पाकळ्या बारीक करून पावडर बनवा आणि त्यात एक चमचा मध मिसळून खा. ही रेसिपी खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम तर देईलच, पण घशातील वेदना आणि संसर्ग दूर करण्यातही मदत करेल.

यकृत डिटॉक्सिफाय

मध आणि लवंग यांचे मिश्रण यकृत डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. यासोबतच हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त ठरते. यासाठी तीन लवंगा बारीक करून बारीक पावडर बनवा, नंतर त्यात एक चमचा मध मिसळून खा.

हे वाचा - हृदयद्रावक! आजारी पत्नीच्या निधनाने बसला धक्का; मृतदेह घरी येण्याच्या आत पतीने केला भयावह शेवट

वजन कमी करण्यास मदत करते

मध आणि लवंगा वजन कमी करण्यासाठीदेखील खूप उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्ही मध आणि लवंगांचा चहा बनवून पिऊ शकता. या दोन्ही गोष्टी कॅलरी बर्न करण्यास मदत करतील. यासोबतच तुम्हाला भूकही कमी लागेल आणि पचनक्रियाही चांगली राहील.

हे वाचा - धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, नुकसान टाळण्यासाठी ठरतील फायद्याच्या

तोंडातील अल्सर

तोंडातील अल्सर, फोडांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि लवंगाचीही मदत घेऊ शकता. यासाठी एक चमचा मधामध्ये लवंग पावडर मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट अल्सरवर लावा आणि काही काळ इतर काहीही खाऊ नका.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips