Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य : तुमची Diwali कशी जाणार पाहा

साप्ताहिक राशीभविष्य : तुमची Diwali कशी जाणार पाहा

Weekly horoscope : दिवाळीच्या या आठवड्यात तुमच्या राशीत काय?

आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021. रविवार तिथी अश्विन कृष्ण दशमी. ह्या आठवड्यात येणार्‍या दिपावलीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास ही दिवाळी मंगलमय, सौख्य, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करणारी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या सप्ताहात 1 नोव्हेंबर रोजी रमा एकादशी आहे. 2 नोव्हेंबर वसुबारस असून या दिवशी गाय वासराचे पूजन केलं जातं. संध्याकाळी धनत्रयोदशी आहे. यमदीपदान आणि धन्वंतरी पूजन केलं जाईल. 3 नोव्हेंबरला तिथी क्षय असून 4 तारखेला सकाळी नरकचतुर्दशी, अभ्यंग स्नान करावं. सायंकाळी अमावस्या, लक्ष्मी पूजन करून दिवाळी साजरी करावी. 5 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, पाडवा असून हा साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मुहूर्त आहे. यादिवशी व्यापाऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होतं. सुवर्ण खरेदी करावी. नोव्हेंबरला भाऊबीज असून चंद्राला अणि भावाला ओवाळलं जातं. ही दिवाळी सर्वांनी आनंदपूर्वक साजरी करावी. या आठवड्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे बुध अणि शुक्र राशी पालट करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी शुक्राचा धनु राशीत प्रवेश झाला असून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी बुध तुला राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी मकर राशीत असून सूर्य मंगळ तुला राशीत आहेत. केतू वृश्चिकेत तर राहू वृषभ राशीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र सिंह राशीत भ्रमण करीत आहे. या आठवड्यातील अमावास्या ही शुभ मानली जाते. पाहूया या आठवड्याचं राशीभविष्य. मेष दिवाळीचा हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना आनंदाचा जाईल. सप्तमात येणारा बुध सूर्यासोबत राजयोग करत असून मंगळाची तीव्र फळे सौम्य करेल. जोडीदाराला सांभाळून घेईल. राशीच्या भाग्य स्थानात आलेला शुक्र एका नवीन सौख्याच्या पर्वाची सुरुवात करेल. मनोकामना पूर्ण होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. धार्मिक कार्य घडेल. उंची वस्तू, दागिने यांची खरेदी कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी खूश राहतील. व्यावसायिक व्यक्तींना अनपेक्षित लाभ होतील. आर्थिक स्थिती उत्तम, कुटुंबासह आनंदात दिवाळी साजरी होईल. वृषभ चतुर्थ चंद्र घरांमध्ये साज सजावट, खरेदी, समारंभाचे आयोजन इत्यादीमध्ये मदत करेल. षष्ठात आलेले तीन ग्रह प्रकृती जपून काम करा असं सुचवत आहेत. अष्टमस्थ शुक्र आर्थिक भरभराट करेल. मात्र स्त्रियांनी काही विशिष्ट समस्या, स्त्रीरोग असतील तर काळजी घ्यावी. संतती सुख चांगलं राहिल. कार्यक्षेत्रात उत्तम लाभ होतील. सप्ताहात मिश्र फळ मिळेल. मिथुन या व्यक्तीनी संततीसाठी काही तरी योग्य निर्णय घेतला तर फायदा होईल. सप्तमात प्रभावशाली जोडीदार, आर्थिक मदत करेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल. काही शुभ घटना घडू शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणारा आठवडा आहे. अष्टमात गुरू आणि शनि मार्गी झालं असले तरी फारसं शुभ नाहीत. प्रकृती जपा. पैसा सांभाळून खर्च करा. मात्र आता शुभ संकेत मिळू लागतील. गेले काही वर्ष तुम्ही सोसलेल्या त्रासाची तीव्रता आता कमी होईल. शुभ सप्ताह. कर्क षष्ठ स्थानात शुक्राचं भ्रमण आहे. मधुमेही व्यक्तींनी जपून राहावं. प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. घरावर भरपूर खर्च होईल. जोडीदार आनंदात असेल. वैवाहिक जीवनात पदार्पण करावंसं वाटेल. गुरु उपासना करावी. आर्थिक अडचणींवर मात कराल. एकूण सप्ताहात प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. दिवाळी मजेत जाईल. सिंह सप्ताहाची सुरवात राशीत असलेला चंद्र, तृतीय स्थानातील ग्रहांची उपस्थिती आणि पंचमात स्थानातील शुक्राचं भ्रमण यांनी दमदार होणार आहे. भरपूर प्रवास होईल. बहीण भावंडांची भेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहिल. आरोग्य जपा. स्थान बदल संभवतो. संततीसंबंधी शुभ समाचार मिळतील. एकूण दिवाळीत प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. कन्या सुरवातीला जरी चंद्र व्यय स्थानात असला तरी इतर ग्रहांची उपस्थिती तुम्हाला उत्तम लाभ मिळवून देणार आहे. अनेक मार्गानी धन येईल. खर्च झाला तरी चिंता करू नका. दागदागिने खरेदी कराल. नोकरीमध्ये तुमच्यासाठी चांगला काळ आहे. चतुर्थ स्थानातील शुक्राचं भ्रमण वाहन सौख्य देईल. कदाचित नवीन घराची बोलणी सुरू होतील. दिवाळी अतिशय प्रसन्न आणि समृद्ध वातावरणात पार पडेल. तुला राशिस्थानी असलेले मंगळ रवि अणि बुध राजयोग करीत आहेत. हातून काही मोठे काम होईल. धार्मिक अणि सामाजिक क्षेत्रात तुला व्यक्ती चमकतील. तृतीय स्थानात आलेला शुक्र भावंडांकडून लाभ दर्शवतो. कलाकारांना अत्यंत शुभ फळ देणारा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. उत्तरार्ध अनुकूल. वृश्चिक राशीच्या व्यय स्थानातील मंगळ रवि बुध खर्चाचे अनेक मार्ग दाखवत असले तरी धन कुटुंब वाणी स्थानात आलेला शुक्र त्यासाठी भरपूर तरतूद करेल. अचानक पैसा मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल. गुरू शनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देतील. कटू शब्द वापरू नका. जोडीदाराकडून आर्थिक लाभ संभवतो. प्रकृतीची मात्र काळजीपूर्वक घ्या. दगदग टाळा. दिवाळी सुखाची जाईल. धनु राशीतील शुक्र सौंदर्य, ओजस्वी वाणी प्रदान करेल. लाभ स्थानात अतिशय प्राबल्य ग्रहांची उपस्थिती अनेक मार्गानी लाभ मिळवून देईल. मित्र मैत्रिणींना भेटणं, मौजमजेसाठी वेळ अणि पैसा खर्च करणं, खरेदी यात वेळ जाईल. धन स्थानात गुरू पैतृक संपत्तीसंबंधी शुभ समाचार देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. सप्ताह आनंदात जाईल. मकर राशीतील गुरू आणि चंद्र सप्ताहात शुभ योग करतील. अत्यंत शुभ वर्तमान मिळतील. नोकरदार व्यक्तींना उत्तम फळ देणारा आठवडा आहे. काम जास्त असेल. धनू राशीतील शुक्र खर्चाचं प्रमाण वाढतं ठेवेल. परदेशगमन किंवा त्यासंबंधी बोलणी सुरू होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. उत्तरार्ध अनुकूल. शुभ दीपावली . कुंभ भाग्य आणि लाभ ही दोन्ही स्थान जागृत असली तर उत्तम फळ मिळणारच. राशी स्वामी शनि गुरू सोबत व्ययस्थानात आहे. परदेशी जाण्याची संधी मिळवून देणारे ग्रहमान आहे. प्रवास योग येतील जोडीदारासाठी शुभ काळ आहे.  मित्रमैत्रिणींसोबत आनंदात वेळ जाईल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. उत्तरार्ध अनुकूल आहे. दिवाळी सुखात जाईल. मीन राशीच्या अष्टमात असलेले ग्रह शारीरिक कष्ट, प्रवास त्यापासून होणारी हानी दाखवत आहेत. खर्च अतोनात होईल. मात्र व्यवसाय असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. दशमातील शुक्र कार्यक्षेत्रात काही नवीन संधी मिळवून देईल. गुरु उच्च लाभ देण्यास सज्ज आहे. संततीसंबंधी शुभ घटना घडतील. आत्मविश्वास आणि पराक्रम वाढेल. बहीण भाऊ भेटतील. पूर्वार्धात शुभ फळ मिळेल. दिवाळी आनंदात जाईल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs

पुढील बातम्या