Diwali 2019: फटाक्यांमुळे भाजल्यावर चुकूनही करू नका या 5 चुका, घरगुती उपायांनी करा उपचार

Diwali 2019: फटाक्यांमुळे भाजल्यावर चुकूनही करू नका या 5 चुका, घरगुती उपायांनी करा उपचार

धोकादायक रसायनांनी भरलेले फटाके उडवल्यामुळे पर्यावरणाचं तर नुकसान होतंच शिवाय यातून निघणाऱ्या आग आणि प्रकाशामुळे अनेक लोक भाजतातही.

  • Share this:

दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे. या दिवशी संपूर्ण देश रंगांनी सजलेला असतो. अनेकदा फटाके उडवताना निष्काळजीपणामुळे किंवा दुसऱ्यांच्या चुकांमुळे इजा पोहोचते. धोकादायक रसायनांनी भरलेले फटाके उडवल्यामुळे पर्यावरणाचं तर नुकसान होतंच शिवाय यातून निघणाऱ्या आग आणि प्रकाशामुळे अनेक लोक भाजतातही. फटाक्यामुळे भाजणं हे वेगळं असतं, त्यामुळे अनेकदा लोक याला सर्वसामान्य भाजणं समजून दुर्लक्ष करतात. फटाक्यांमुळे जर तुम्ही भाजला असाल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही यावर उपचार करू शकता. फटाके फोडताना थोडासा जरी निष्काळजीपणा झाला तर अनेकदा मोठा अपघात होऊ शकतो.

फटाक्यांमुळे भाजल्यानंतर या 5 चुका कधीही करू नका-

- फटाक्यांच्या भाजण्यावर लोक अनेकदा बर्फाचा उपयोग करतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे ररक्त एका जागी साखळतं आणि रक्ताभिसरण सुरळीत होत नाही. यामुळे शक्यतो बर्फाचा उपयोग करू नये.

- जर त्वचेवर भाजल्यामुळे फोड आले असतील तर ते फोडू नका. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

- शक्यतो कापड किंवा कापसाचा वापर जखमेसाठी करू नका. कारण जखमेवर कापूस आणि कापड चिकटू शकतं. तसेच याचा उपयोग केला तर जळजळ कमी होण्याऐवजी अजून वाढते.

- जास्त प्रमाणात जखम झाली असेल तर पाण्याऐवजी ओआरएस प्यायल्या द्या. भाजल्यानंतरच्या काळात पाणी श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते.

- गंभीर स्वरुपात भाजलं असेल आणि जखमेवर कपडे चिकटले असतील तर ते काढण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी रुग्णाला लवकरात लवकर रुग्णालयात नेऊन त्यावर उपचार सुरू करावेत.

घरगुती उपचार-

पाण्याचा वापर- फटाके किंवा कोणत्याही ज्वलनशील पदार्थांमुळे भाजल्यावर जळणाऱ्या भागावर थंड पाणी टाका. हात किंवा पाय जळले असतील तर थंड पाण्यात हात- पाय थोडावेळा भिजवून ठेवा. यानंतर लगेच डॉक्टरांना संपर्क करा.

नारळाचं तेल-  फटाक्यांमुळे होणारी जळजळ त्वचेवर कमी दिसत असली तरी ती वेदना असह्य असते. जळलेल्या भागावर नारळाचं तेल लावणं कधीही फायदेशीर असतं. नारळाचं तेल जळजळ कमी करते आणि आराम देते. जर एखादी व्यक्ती जास्त भाजली असेल तर नारळाचं तेल लावल्यानंतर लगेच डॉक्टरांना संपर्क करावा.

तुळशीच्या पानांचा रस-

तुळशीच्या पानांचा रस काढून तो जळलेल्या त्वचेवर लावा. तुळशीचा रस हा फार गुणकारी आहे आणि त्वचेची जळजळ कमी करतो. तसेच हा रस दररोज भाजेलेल्या जखमेवर लावला तर डागही नाहीसा होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Published by: Madhura Nerurkar
First published: October 25, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या