वॉशिंग्टन, 14 फेब्रुवारी : व्हेलेंटाइन्स डे (Valentine's Day) निमित्त जगभरातील लोकांनी आपल्या व्हेलेंटाइनला चांगल्या चांगल्या गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. अमेरिकेत मात्र एका पत्नीने आपल्या पतीला असं काही गिफ्ट दिलं की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. सध्या तिच्या या गिफ्टची जगभरात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे.
पत्नीचा अनोखं गिफ्ट...
अमेरिकेतील एक टिकटॉक युजर @Gr93la ने आपल्या पतीना विचित्र असं गिफ्ट दिलं आहे. तो हे गिफ्ट आयुष्यभर विसरू शकणार नाही, हे नक्की. ग्लोरिया नावाच्या या महिला आपल्या पतीच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर नजर ठेवत होती. तिने 2021 च्या व्हेलेंटाइनडेनिमित्त पतीला 440 वोल्टचा झटका देण्याचं ठरवलं होतं. या महिलेने पतीने इन्स्टाग्रामवर लाइक केलेल्या त्या सर्व महिलांचे फोटो प्रिंट करुन गिफ्ट केलं. यानंतर ग्लोरियाने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करीत याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा-वेब सीरिजमधील इन्टिमेट दृश्यांवर सेन्सॉरशीपची मागणी; या अभिनेत्रीचा थेट नकार
क्यूट लिट्ल बॉक्स
ग्लोरियाने लिहिलं आहे की, आज प्रत्येक व्यक्ती आपल्या पार्टनरला गिफ्ट देण्याबद्दल बोलत आहे. त्यामुळे मीदेखील माझा क्यूट लिट्स बॉक्स दाखवते. ग्लोरियाने हे सांगितल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचं कौतुक केलं. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, आपल्या पती वा बॉयफ्रेंडला व्हेलेंटाइन डेला काय गिफ्ट दिलं? या व्हिडिओला एकाच दिवसत एक कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. ग्लोरियाने हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन डाऊनलोड केले व ते प्रिंट केले. अनेकांना तर ग्लोरियाच्या पतीने काय प्रतिक्रिया दिली, हे सांगण्याची विनंती केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.