लंडन, 12 ऑक्टोबर : भूत आहेत की नाहीत माहिती नाही. काही लोकांच्या मते जसे देव आहेत तसे भूतही आहेत. तर काही जणांचा यावर बिलकुल विश्वास नाही. तरी हॉरर स्टोरी वाचायला, हॉरर फिल्म पाहायला बहुतेकांना आवडतं. अशाच हॉरर फिल्मपैकी एखाद्या फिल्ममध्ये चक्क भूतही सेक्स करत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. एखाद्या भूताचं जिवंत महिलेवर प्रेम जडलं
(Ghost Lover) आणि तो तिच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवतो
(Sex with ghost), असं दृश्य काही फिल्ममध्ये आपण पाहिलं असावं. पण एका महिलेने आपल्यासोबत असं प्रत्यक्षात घडत असल्याचा दावा केला आहे.
भूतासोबत सेक्स करत असल्याचा दावा करणारी यूकेतील 38 वर्षांची ब्रोकर्डे
(Brocarde) एक गायिका आहे. तिने आपली भुतासोबतची विचित्र लव्हस्टोरी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपलं भूतावर प्रेम जडलं, तो भूत आपल्यासोबत शारीरिक संंबंधही ठेवतो आणि आता ऑर्गेझमनेच तो आपला जीव घेण्याचा प्रयत्न करतो आहे (Ghost Gives Killing Orgasm), असा दावा केल्याने ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हे वाचा - Shocking! GF भेटणार म्हणून चढला जोश; तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट गमावला
रिपोर्टनुसार ब्रोकर्डेने सांगितलं, एके रात्री तिला झोप लागत नव्हती. तेव्हा एडवर्डो नावाचं भूत तिच्याजवळ आलं. तो एक सैनिक होता. वयाच्या पस्तीशीत त्याचा मृत्यू झाला. ब्रोकर्डे एडवर्डोच्या भूताच्याच प्रेमात पडली. हळूहळू दोघंही रोमान्स करू लागले, सेक्स करू लागले. पण आता त्यांचं हे प्रेमळ नातं आता खतरनाक रूप घेत आहे.

एडवर्डोच्या भूताचा स्पर्श तिला आवडतो पण त्यामुळे मिळणारं ऑर्गेझम तिला जीवघेणं वाटतं. सेक्स करताना मिळणारं ऑर्गेझम खूप तीव्र आहे. ते तिला सहन होत नाही. यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो, असं तिनं म्हटलं आहे. तिचा हा भूत बॉयफ्रेंड तिला इतकं इंटेन्स ऑर्गेझम देतो की तिचा श्वास थांबतो. आता आपण जिवंत राहणार नाही, असंच वाटतं. आपण मरावं आणि भूत बनावं म्हणून तो मुद्दाम असं करत असल्याचं तिला वाटतं. त्यामुळे तिला आता त्याच्यासोबत रोमान्स करायला भीती वाटते.
हे वाचा - ऐकावं ते नवल! हिला चक्क भाज्यांची वाटते भीती; पाहताच दरदरून फुटतो घाम कारण...
एडवर्डोचं भूत प्रत्येक रात्री तो तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवतो. जेव्हा त्याचं मन करतं तेव्हा तो तिच्याकडे येतो. ब्रोकर्डेचं मन असो वा नसो तिला त्याच्यासोबत सेक्स करावाच लागतो. त्यानंतर ते भूत तिथून निघून जातं आणि परत येत नाही. नकार दिला तर तो नाराजसुद्धा होता. त्यामुळे ती त्याला नकारही देऊ शकत नाही. आता काय करावं तेच तिला समजत नाही आहे. त्यामुळे आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर करत तिने मदत मागितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.