जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Digestion Healthy TIPS: पचनसंस्था चांगली त्याचं आरोग्यही चांगलं; म्हणून आहारात या 5 गोष्टी असाव्यात

Digestion Healthy TIPS: पचनसंस्था चांगली त्याचं आरोग्यही चांगलं; म्हणून आहारात या 5 गोष्टी असाव्यात

पचनासाठी चांगले - 
पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर भेंडी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, भेंडीमध्ये भरपूर फायबर असतात, जे पचनशक्ती मजबूत ठेवण्यास आणि पोट साफ करण्यास मदत करतात.

पचनासाठी चांगले - पोटाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर भेंडी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, भेंडीमध्ये भरपूर फायबर असतात, जे पचनशक्ती मजबूत ठेवण्यास आणि पोट साफ करण्यास मदत करतात.

पोटात बद्धकोष्ठता किंवा गॅस तयार होण्याचा त्रास होत असेल तर हे खराब पचनाचे लक्षण असू शकते. पाचन तंत्र नीट राखणं हे एक कठीण काम आहे. धावपळीच्या जीवनशैलीत पचनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मार्च : आपली पचनसंस्था जितकी चांगली असेल तितके आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. पोटात बद्धकोष्ठता किंवा गॅस तयार होण्याचा त्रास होत असेल तर हे खराब पचनाचे लक्षण असू शकते. पाचन तंत्र नीट राखणं हे एक कठीण काम आहे. धावपळीच्या जीवनशैलीत पचनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. अवेळी खाणं, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाणं, फळं-हिरव्या पालेभाज्या न खाणं इत्यादींमुळे पचनसंस्था बिघडत (Digestion Healthy TIPS) जाते. खराब पचनामुळे या समस्या उद्भवतात झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी, योग्य पचन सर्वात महत्त्वाचे आहे. पचनाच्या समस्येमुळे लोकांना अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. चांगल्या पचनासाठी, आपल्याला आहार संतुलित करावा लागेल. या बातमीत आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे पचनशक्ती सुधारू शकतात. नाश्त्यात या पदार्थांचा समावेश जरूर करावा. पचन सुधारणारे पदार्थ 1. मध-लिंबू सेवन कोमट पाण्यासोबत मध आणि लिंबू घेतल्याने पचन आणि रोगप्रतिकारशक्ती दोन्ही सुधारते. हे सकाळी लवकर रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया वाढते, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. 2. पपई निरोगी आतड्यांसाठी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पपई हे परिपूर्ण अन्न आहे. नाश्त्यात पपईचे सेवन केल्याने दिवसभर पचन सुधारण्यास मदत होते, कारण त्यात पपेन नावाचे पाचक एंझाइम असते. 3. सफरचंद सफरचंद पचनसंस्थेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे अ, क आणि भरपूर खनिजे आणि पोटॅशियम देखील असतात. फायबर भरपूर असल्याने ते निरोगी पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे. हे वाचा -  कुटुंबाच्या सुख-शांती-समृद्धीसाठी वास्तुशास्त्राच्या या गोष्टी कायम ध्यानात ठेवा 4. काकडी काकडीत इरेप्सिन नावाचे एन्झाइम असते, जे योग्य पचनास मदत करते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या काकडीचे चमत्कारिक परिणाम अनेक आहेत. पोटातील आम्लता, जठराची सूज आणि पेप्टिक अल्सरपासून यामुळे आराम मिळतो. हे वाचा -  दूध पिण्याच्याबाबतीत अशी चूक बरेचजण करतात; या वेळात प्यायल्यानं अनेक त्रास होतात 5.केळी पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर रोज एक केळी खा. उच्च फायबर सामग्रीमुळे, चांगल्या आतड्यांसंबंधी हालचालींसाठी देखील केळी महत्त्वाची आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात