नवी दिल्ली, 24 मार्च : घरातील अनेक छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या नीट ठेवणं किंवा योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं. यामुळे घरात आनंदी वातावरण (Happy home) राहतं. घरात सुख-समृद्धी-आनंद राहण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापद्धतींचा अवलंब केल्यास वास्तूदोष दूर होऊन अनेक अडचणी दूर होऊ (Vastushastra tips) शकतात. खोल्यांमध्ये नैसर्गिक प्रकाश पडावा - वास्तुशास्त्रानुसार, घर बांधताना लक्षात ठेवा की नैसर्गिक प्रकाश (सूर्यप्रकाश) प्रत्येक खोलीत किंवा किमान प्रत्येक बेडरूममध्ये पोहोचला पाहिजे. या प्रकाशासह घरात आणि आपल्या जीवनात सकारात्मकता नांदते. घरात भांडण किंवा विसंवादाची परिस्थिती निर्माण होत नाही. भिंतीला चीर पडलेली असू नये - वास्तुशास्त्रानुसार, जर उत्तर दिशेला कोणत्याही भिंतीमध्ये भेग दिसत असेल तर ती त्वरित दुरुस्त करा. असे मानले जाते की या भेगा अशुभ असू शकतात, एवढेच नाही तर चीर पडलेल्या भिंतींमुळे कौटुंबिक कलह आणि भांडणे देखील होऊ शकतात. जर घरात कलह वाढला तर तुळशीचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे. हे वाचा - उन्हाळ्यात अपचन-अॅसिडिटी होणारच नाही, या गोष्टी आहारात घ्यायला विसरू नका झाडू काळजीपूर्वक ठेवा - वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, झाडू घरात एकमेकांवर आडवा ठेवू नये. यामुळे कुटुंबातील महिलांचे एकमेकांसोबत पटत नाही, दररोज भांडणे होतात. अशा परिस्थितीत मेणबत्तीवर तूप आणि गूळ मिसळून रविवारी जाळून टाका, कुटुंबाचे वातावरण सुधारेल. हे वाचा - Makeup Mistakes : मेकअप करताना होणाऱ्या या 4 चुकांमुळे आपण जास्त एजड् दिसतो सुकलेली फुले घरात ठेवू नका- वास्तूशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात फुले ठेवावीत, पण विशेषतः काळजी घ्या की वाळलेली फुले घरात अजिबात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.