मुंबई, 29 जानेवारी : आजकाल लोक ज्या प्रकारे मधुमेहाला बळी पडत आहेत, त्यामुळे आज मधुमेह ही गंभीर समस्या बनत चालली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मधुमेहाचे व्यवस्थापन करणे बर्याच लोकांसाठी खूप कठीण होते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार आणि व्यायाम, योग्य वेळी औषधे घेणे, सकस आहाराच्या सवयी अंगीकारणे यासारख्या गोष्टींकडे सतत लक्ष दिले पाहिजे, तरच तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. अनेकदा काही लोकांना मधुमेहामुळे रात्री नीट झोप लागत नाही. मात्र रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्या तर या असाध्य आजारावर तुम्ही बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवू शकता.
Healthline.com नुसार, झोप प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिनचा प्रतिकार वाढू शकतो. तुमचा मूड आणि भूक प्रभावित करू शकते. मधुमेहामुळे काही लोकांच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. रक्तातील साखर रात्रभर कमी होऊ शकते किंवा वाढू शकते, ज्यामुळे तुमची झोप खंडित होते. रात्रभर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी काही गोष्टी करू शकता. जर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी काही दिनचर्या पाळल्या तर तुम्ही मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकताच, पण त्यामुळे तुम्हाला चांगली झोपही मिळेल. याच्या मदतीने मधुमेहाची लक्षणेही सहज नियंत्रित करता येतात.
हे 6 अवयव देतात हाय ब्लड शुगरचे संकेत, वेळीच ओळखून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हे काम करा
- रात्री झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासा. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी साखरेची पातळी तपासत राहणे खूप महत्वाचे आहे. अनेकदा लोक दिवसभर त्यांची साखरेची पातळी तपासत राहतात. सकाळी, संध्याकाळी, जेवण्यापूर्वी, जेवल्यानंतर, परंतु रात्री झोपण्यापूर्वी देखील ही सवय लावा. रात्री झोपताना साखरेची पातळी 88-80 mg/dL च्या श्रेणीत असावी.
- एका संशोधनानुसार, जर तुम्ही झोपण्यापूर्वी थोडेसे चालत असाल तर ते शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करू शकते. शारीरिक हालचालींमुळे शरीर अधिक इंसुलिन संवेदनशील बनते. त्यामुळे तुम्ही दररोज रात्री फिरायला जावे, अगदी झोपण्यापूर्वी 15 मिनिटे तरी.
- चांगल्या आणि गाढ झोपण्यासाठी तुमच्या खोलीचे वातावरण सुधारा. खोली शांत असावी, प्रकाश नसावा आणि आरामदायी बेड असावा. रात्रीच्या वेळी आवाजामुळे झोपेचा त्रास होतो, अशावेळी मोबाईल खोलीबाहेर ठेवा किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. मोबाईलची रिंगटोन कमी करा. शरीर मेलाटोनिन हार्मोन तयार करते, जे झोपायला मदत करते. खोलीतील प्रकाशामुळे मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. जर तुम्ही जास्त प्रकाशात झोपले तर कमी मेलाटोनिन तयार होईल. यामुळे तुमच्या झोपेत रात्रभर व्यत्यय येईल.
- रात्री झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त कॉफी, काही चहा, चॉकलेट, सोडा इत्यादींचे सेवन टाळा. कॅफिनयुक्त पदार्थ आणि पेये तुमची झोप व्यत्यय आणू शकतात आणि तुम्हाला रात्रभर जागे ठेवू शकतात. ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांनी रात्री मद्यपान टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तुम्ही मद्यपान करत असलो तरीही, अल्कोहोलचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी तुमची साखरेची पातळी नियमितपणे तपासणे चांगले.
- मधुमेहाच्या रुग्णांनी दात आणि हिरड्यांची अधिक काळजी घ्यावी. टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आणि फ्लॉस करणे आवश्यक आहे, कारण त्यांना हिरड्यांचे आजार आणि पोकळी होण्याची अधिक शक्यता असते.
Diabetes And Peanut : डायबिटीजच्या रुग्णांनी शेंगदाणे खावे का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
- रक्तातील साखरेची पातळी देखील चिंता, तणावामुळे प्रभावित होऊ शकते. तणाव आणि चिंताची लक्षणे कमी करण्यासाठी रात्री योग्य झोप आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यही निरोगी राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes