मुंबई, 25 ऑक्टोबर : हिवाळ्यात ओलावा वाढतो, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात बॅक्टेरिया, विषाणू, बुरशीचा धोका वाढतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप, संसर्ग आदींचा धोका वाढतो. परंतु ही अशी वेळ आहे जेव्हा शरीराच्या तापमानात बदल झाल्यामुळे शरीराला संतुलन साधण्यास वेळ लागतो. अशा स्थितीत जुनाट आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे तज्ञ मधुमेही रुग्णांना त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देतात जेणेकरुन शरीरात अचानक झालेल्या बदलांमुळे खराब झालेल्या गोष्टी संतुलित करता येतील. खरं तर, काही गोष्टी अशा असतात की हिवाळ्यात शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखर वाढू देत नाही. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
Diwali 2022 : मिठाई कितीही खाल्ली तरी काही फरक पडणार नाही; फक्त खाण्याची पद्धत बदला
मधुमेहासाठी आहार
Cinnamon Tea म्हणजेच दालचिनी चहा - EverydayHealth नुसार, थंडीच्या मोसमात चहा किंवा कॉफी प्रत्येकाच्या आवडीची बनते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दालचिनीचा चहा घ्या. दालचिनीमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. याशिवाय दालचिनीचा चहा हृदयाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे.
स्प्राउट्स - स्प्राउट्स म्हणजे अंकुरलेले संपूर्ण धान्य. संपूर्ण धान्य हे सुपर फूड आहे. पण त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने कमी होते. एक कप स्प्राउट्समध्ये फक्त 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय यामध्ये 6 ग्रॅम डायटरी फायबर असते जे पचनशक्ती मजबूत करते.
रताळे - रताळे खूप गोड असतात. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यात जास्त कार्बोहायड्रेट्स आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे योग्य अन्न आहे. रताळ्यामध्ये फोटोकेमिकल बीटा कॅरोटीन असते जे व्हिटॅमिन ए मध्ये बदलते. त्यामुळे ते डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये सुपर फूडचे गुणधर्म असतात. हिवाळ्यात मधुमेहींनी भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. एक कप भोपळ्याच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट नगण्य असते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
दिवाळीला भेसळयुक्त मिठाई तर खेरदी करत नाही ना? असे ओळखा बनावट पदार्थ
काजू - काजू हे मधुमेहींसाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. काजू फक्त हृदयरोगींसाठी आरोग्यदायी नसून ते रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. काजूमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि हेल्दी फॅटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. या सर्वांशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी खोबरेल तेल, मासे, फ्लेक्ससीड्स, चिया बिया इत्यादींचे सेवन करावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes