मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes And Physiotherapy : फिजिओथेरपीद्वारे खरंच डायबिटीज कंट्रोल होऊ शकते का?

Diabetes And Physiotherapy : फिजिओथेरपीद्वारे खरंच डायबिटीज कंट्रोल होऊ शकते का?

मधुमेह हा मुळात दोन प्रकारचा असतो - टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह सामान्यतः अनुवांशिकतेमुळे होतो, तर टाइप 2 मधुमेह हा अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे होतो.

मधुमेह हा मुळात दोन प्रकारचा असतो - टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह सामान्यतः अनुवांशिकतेमुळे होतो, तर टाइप 2 मधुमेह हा अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे होतो.

मधुमेह हा मुळात दोन प्रकारचा असतो - टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह. टाइप 1 मधुमेह सामान्यतः अनुवांशिकतेमुळे होतो, तर टाइप 2 मधुमेह हा अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 जानेवारी : मधुमेह हा जगातील प्रमुख आजारांपैकी एक आहे, ज्यावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. हा एक चयापचय विकार आहे ज्यामध्ये शरीर कमी इंसुलिन तयार करते किंवा अजिबात तयार करत नाही. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते. मधुमेह हा मुळात दोन प्रकारचा असतो - टाइप 1 मधुमेह आणि टाइप 2 मधुमेह.

टाइप 1 मधुमेह सामान्यतः अनुवांशिकतेमुळे होतो, तर टाइप 2 मधुमेह हा अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि आहारामुळे होतो. दुर्दैवाने, मधुमेहावर कोणताही इलाज नाही. मात्र जीवनशैलीतील बदलांमुळे यावर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या व्यवस्थापनात फिजिओथेरपी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी फिजिओथेरपी कशी फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.

देशात झपाट्याने वाढताहेत डायबिटिक किडनी डिजीजची प्रकरणं, ही आहेत लक्षणं

झी न्यूज हिंदीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, नियमित फिजिओथेरपीचा टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांवर विशेषत: वृद्ध आणि सह-विकृती असलेल्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. फिजिओथेरपी केवळ मधुमेहाची लक्षणे वाढण्यापासून रोखण्यास मदत करते. त्याचबरोबर दिसणारी लक्षणे व्यवस्थापित करण्यात देखील मदत करते.

फिजिओथेरपीद्वारे लोकांना निरोगी वजन वाढवण्यात मदत होते. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, थकवा कमी होतो, मस्कुलोस्केलेटल समस्या कमी करण्यासदेखील हे मदत करते. फिजिओथेरपीसोबत संतुलित आहार आणि निरोगी वजनदेखील आवश्यक आहे. भविष्यात कोणतीही अडचण किंवा समस्या येऊ नये म्हणून लोकांनी नेहमी व्यावसायिक फिजिओथेरपिस्टची सेवा घेतली पाहिजे.

ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle