मुंबई, 15 ऑक्टोबर : आता दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणीत झालेला दिसतो आहे. मार्केटमध्येही खरेदीसाठी गर्दी दिसून येतेय. नव्या वस्तू घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. पण हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणं अयोग्य आहे. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ ने दिलं आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवाळीतील तिसरा दिवस.. या दिवसाचं महत्त्व सांगणारी कथा पुराणात दिली आहे. या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. तसंच या दिवशी देवांचा वैद्य म्हणवल्या जाणाऱ्या धन्वंतरीचीही पूजा केली जाते. यंदा 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं, चांदी खरेदी केल्यास घरात समृद्धी, सुख, शांती कायम राहते. पण या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. 1. प्लॅस्टिकच्या गोष्टी विकत घेऊ नका धनत्रयोदशीसारख्या चांगल्या दिवशी अनेकजण विविध गोष्टी खरेदी करतात. पण या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकची भांडी विकत घेऊ नका. लक्ष्मीपूजनाचा दिवस लक्षात घेऊन लोकं या दिवशी वस्तू, भांडी खरेदी करतात. परंतु, देवी लक्ष्मीला दाखवला जाणारा नैवेद्य हा प्लॅस्टिकच्या भांड्यात दाखवणं निषिद्ध मानलं गेलंय. यासाठी अशी भांडी धनत्रयोदशीच्या दिवशी विकत घेऊ नयेत. हेही वाचा - Diwali Shopping : धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा ‘सुवर्णवेळ’ 2. आर्टिफिशियल ज्वेलरी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने विकत घेण्याची प्रथा आहे. पण चुकूनही या दिवशी आर्टिफिशियल ज्वेलरी विकत घेऊ नका. यामुळे तुमच्या आयुष्यात नेहमीच संकटं येत राहतात. तसंच देवी लक्ष्मीची तुमच्यावर अवकृपा होते असं मानलं गेलं आहे. आर्टिफिशल ज्वेलरी देवीला अर्पण केल्यास तुम्ही आर्थिक संकटात पडून घरात दारिद्र्य येऊ शकतं. 3. लोखंडी वस्तू खरेदी करू नका धनत्रयोदशीदिवशी कुठलाही धातू विकत घेणं शुभ मानलं जातं. पण म्हणून लोखंडी वस्तू विकत घेऊ नका. शास्त्रात हे निषिद्ध मानलं गेलंय. यामुळे समृद्धी आणि सुखाची हानी होते. तसंच लोखंडाच्या गोष्टी या शनिवारी किंवा धनत्रयोदशीला विकत घेतल्यास शनिदेवांची अवकृपा होते.
4. कार आणि घर विकत घेणं टाळा हिंदू धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीदिवशी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नये. जसं की, घर, कार, दुकान विकत घेऊ नये. पण जर तुम्हाला विकत घ्यायचंच असेल तर आर्थिक व्यवहार एक दिवस आधी करावा. प्रत्येक सणानुसार काही रितिभाती असतात. अनेकांना सणाच्या दिवशी या रितींचं पालन कसं करावं याची पुरेशी माहिती नसते. यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा होतो. त्यामुळे होणारं नुकसानही टळतं हे मात्र निश्चित.