सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता 'हे' टेडिबिअर करणार मदत

सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आता 'हे' टेडिबिअर करणार मदत

कोरोनाचा संसर्ग आणि वेगानं होणारं संक्रमण टाळण्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्स आणि मास्क दोन्हीचं पालन करणं अत्यावश्यक आहे.

  • Share this:

पॅरिस, 01 जुलै : कोरोना व्हायरसचं थैमान जगभरात सुरू आहे. त्यामध्ये आता आणखी एक नवीन व्हायरस सापडला आहे. कोरोनामुळे अनेक दिवस लॉकडाऊन होतं मात्र हा पर्याय कायमचा तर नाही करता येणार त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळणं अनिवार्य आहे. वारंवार सांगूनही सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्यानं वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जात आहेत.

कधी बूट, कधी छत्री तर कधी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आलेल्या टोपीचे फोटोही तुफान व्हायरल झाले होते. आता आणखी एक आयडिया पॅरिसमध्ये वापरण्यात आली आहे. इथे एका ओपन रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी एक खुर्ची सोडून टेडीबेअर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या टेडीबेअरची मदत सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि वेगानं होणारं संक्रमण टाळण्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्स आणि मास्क दोन्हीचं पालन करणं अत्यावश्यक आहे.

भारतात कोरोनाची काय आहे स्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 24 तासांत 18 हजार 522 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 66 हजार 840 वर पोहोचला असून त्यापैकी 2,15,12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3 लाख 34 हजार 822 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनामुळे मागच्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 16 हजार 893 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारातून रुग्ण बरे होण्याचा आतापर्यंतचा दर 59.6% झाला आहे. त्यामुळे ही थोडी दिलासा देणारी बाब आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 1, 2020, 8:47 AM IST

ताज्या बातम्या