जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रक्ताची कमतरता असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे; दुर्लक्ष करू नका, वेळीच घ्या काळजी

रक्ताची कमतरता असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे; दुर्लक्ष करू नका, वेळीच घ्या काळजी

रक्ताची कमतरता असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे; दुर्लक्ष करू नका, वेळीच घ्या काळजी

आपल्या शरीरात रक्ताची कमतरता (Lack Of Blood In Body) असेल तर आपल्याला अ‍ॅनिमिया (Anemia) होण्याची शक्यता असते. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जुलै : आपल्या शरीरात रक्ताची पातळी योग्य आहे की नाही याकडे देणे गरजेचे असते. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता (Lack Of Blood In Body) असेल तर आपल्याला अ‍ॅनिमिया (Anemia) होण्याची शक्यता असते. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे (Iron Deficiency) तुम्हाला थकवा तर जाणवेलच पण इतर अनेक समस्याही सुरू होऊ शकतात. जेव्हा तुम्ही सकस आहार घेत नाही तेव्हा अॅनिमिया होतो. लोह भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या शरीरात जर रक्ताची कमतरता (Anemia Symptoms) असेल तर तुमचे शरीर कोणते संकेत देते. स्टाइलक्रेजमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीला सतत अॅनिमियाचा त्रास होत असेल तर त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी (Low Hemoglobin) किंवा लाल रक्तपेशींची संख्या सामान्यपेक्षा कमी होते. लाल रक्तपेशी संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असलेले लोहयुक्त प्रोटीन आहे. जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता येते तेव्हा खालील लक्षणे दिसतात. शरीरात रक्ताची कमतरता असल्याची लक्षणे - थकवा जाणवणे - फिकट गुलाबी त्वचा - थंड हात आणि पाय - अशक्त वाटणे - चक्कर येणे

डॉक्टरांनी केली कमाल! दोन्ही किडनी शरीराच्या एकाच भागात जोडून वाचवला रुग्णाचा जीव

- डोकेदुखी - छातीत दुखणे - केस गळणे - शरीरात सहनशक्तीचा अभाव - अनियमित हृदयाचा ठोका - कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण   Knee Pain Relief : आता वेदनेला म्हणा बाय-बाय; ‘हे’ आहेत गुडघेदुखीवर रामबाण उपाय शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी (Food For Anemia) तुम्ही काही पदार्थ खाणे आवश्यक आहे. ज्या लोकांना अॅनिमियाचा त्रास होतो किंवा शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा (Iron Rich Food) समावेश करावा. पालक, काळे मनुके, ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, अंड्यातील पिवळ बलक, केळी, बीट, रताळे, शेंगा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सफरचंद, प्रोटीनयुक्त पदार्थ इत्यादी खावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात