"एक चुटकी ड्रग की नशा...", DRUG संबंधी चॅट समोर येताच ट्रोल झाली दीपिका

अभिनेत्री दीपिका पादुकोणचे ड्रग्ससंबंधी चॅट समोर येताच #BoycottDeepikaPadukone ट्रेंड होऊ लागला.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणला (deepika padukone) एनसीबी (ncb) लवकरच समन्स बजावण्याची शक्यता आहे. तिचे ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. ड्रग्ज कनेक्शनमध्ये नाव येताच दीपिका पादुकोण ट्रोल होऊ लागली आहे. सोशल मीडियावर नेटिझन्स तिच्यावर निशाणा साधू लागले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर दीपिका पादुकोणने त्याचा संबंध मानसिक आरोग्याशी जोडला होता. त्यावेळीदेखील दीपिका ट्रोल झाली होती. त्यादरम्यान दीपिकाने काही ट्वीट केले होते. आता तिचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर याच ट्वीटवरून नेटिझन्स तिला पुन्हा लक्ष्य करू लागले आहेत. दीपिकावर अनेक मीम्स तयार होऊ लागले आहेत. #BoycottDeepikaPadukone हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे.

एक चुटकी ड्रागस की नशा तुम क्या जानो रमेश बाबू, असं म्हणत दीपिकाच्या फिल्ममधील डायलॉगमधून एका ट्वीटर युझरने निशाणा साधला आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान दीपिकाचे ड्रग्जसंबंधी चॅटही समोर आले आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतचे हे चॅट आहेत. त्यामुळे करिश्मा प्रकाश आणि KWAN  टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यानंतर आता दीपिकालाही समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितंल, NCB सुरुवातीला करिश्मा प्रकाशची चौकशी करे आणि गरज पडल्यास दीपिका पादुकोणलाही समन्स बजावला जाईल.

>दीपिका आणि करिश्माच्या ड्रग्जसंबंधी चॅटमध्ये काय आहे?

दीपिका - 'तुझ्याकडे माल आहे का'.

करिश्मा - 'हो... पण घरी आहे. मी आता वांद्रेला आहे...'. 'मी अमितला पाठवू शकते'

दीपिका - 'हो, प्लीज.'

करिश्मा - 'अमित घेऊन येत आहे.'

दीपिका  - 'हॅश आहे का?'

करिश्मा - 'हॅश नाही गांजा आहे.'

हे वाचा - ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका पादुकोणलाही NCB लवकरच समन्स बजावणार

दीपिकाचे हे चॅट पाहिल्यानंतर, 'दीपिका हॅश हवं का', 'माल मिळाला की नाही', असे प्रश्न तिला ट्वीट करून विचारण्यात आलेत.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत.

हे वाचा - रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; 6 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

ड्रग्ज कनेक्शनमध्ये याआधी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तिच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. रियाला आता 6 ऑक्टोबरपर्यंत रियाला तुरुंगात राहावं लागणार आहे. दरम्यान दीपिका आणि श्रद्धा कपूरचं नाव आल्यानंतर रिया या दोघींचीही जेलमध्ये प्रतीक्षा करत आहे, असे मीम्सही व्हायरल झाले.

एसीबीने आता दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि KWAN  टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. NCB सुरुवातीला करिश्मा प्रकाशची चौकशी करेल आणि गरज पडल्यास दीपिका पादुकोणलाही समन्स बजावला जाईल, असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Published by: Priya Lad
First published: September 22, 2020, 4:35 PM IST

ताज्या बातम्या