रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; 6 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; 6 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ

येत्या काळात तिच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी (Sushant Singh rajput) संबंधित (Drugs case) ड्रग्ज कनेक्शनमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला (Rhea Chakraborty) अटक करण्यात आली आहे. मात्र येत्या काळात तिच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

कोर्टाने रियाची अटक 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. आता 6 ऑक्टोबरपर्यंत रियाला तुरुंगात राहावं लागणार आहे. रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍यूरो (NCB) ने ड्रग्‍स प्रकरणात तिला अटक केली होती. तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि काही ड्रग्‍स तस्‍कऱ्यांनादेखील अटक करण्यात आलं होतं. रिया चक्रवर्ती आणि शोविक यांची न्यायालयीन अटक आज संपणार होती. तर दुसरीकडे रिया आणि शोविकने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. रिया आणि शोविक यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याची माहिती त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबी करीत आहे. आतापर्यंत एनसीबीने अनेकांना अटक केली आहे. यामध्ये शोविक व रिया यांचा समावेश आहे.

हे वाचा-ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर दीपिकाला समन्स बजावणार का? NCB ने दिली माहिती

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलर्सची चौकशी करताना समोर आली आहेत. त्यामुळे एनसीबीकडून प्रश्नोत्तरासाठी श्रद्धा आणि साराला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून आज किंवा उद्याच सारा-श्रद्धाची चौकशी केली जाईल, अशी माहिती एनसीबीच्या टॉपच्या सूत्रांकडून मिळते आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्रीबरोबर सुशांतने काम केले आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 22, 2020, 3:49 PM IST

ताज्या बातम्या