ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका पादुकोणलाही NCB लवकरच समन्स बजावणार

ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिका पादुकोणलाही NCB लवकरच समन्स बजावणार

दीपिका पादुकोणचे (Deepika Padukone) ड्रग्जसंबंधी चॅट समोर आल्यानंतर आता दीपिकाही एनसीबीच्या रडारवर आहे.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर (rhea chakrabprty) आणखी काही अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण (deepika padukone). आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो  (NCB) दीपिकालाही लवकर समन्स बजावण्याची शक्यता आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान दीपिकाचे ड्रग्जसंबंधी चॅटही समोर आले आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशसोबतचे हे चॅट आहेत. त्यामुळे करिश्मा प्रकाश आणि KWAN  टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीचे सीईओ ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यानंतर आता दीपिकालाही समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितंल, NCB सुरुवातीला करिश्मा प्रकाशची चौकशी करे आणि गरज पडल्यास दीपिका पादुकोणलाही समन्स बजावला जाईल.

दीपिका आणि करिश्माच्या ड्रग्जसंबंधी चॅटमध्ये काय आहे?

दीपिका - तुझ्याकडे माल आहे का?

करिश्मा - हो... पण घरी आहे. मी आता वांद्र्याला आहे. मी अमितला पाठवू शकते.

दीपिका - हो, प्लीज

करिश्मा - अमित घेऊन येत आहे.

दीपिका  - हॅश आहे का?'

करिश्मा - हॅश नाही गांजा आहे.

हे वाचा - ड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर? 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) केलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पादुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) अशी नावं समोर आली आहेत. रिया चक्रवर्तीने आपल्या जबाबात 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं सांगितली होती. शिवाय एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पेडलर्सकडूनही काही जणांची नावं समोर आल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

हे वाचा - बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात मराठमोळ्या अभिनेत्रीलाही NCB पाठवणार समन्स

या प्रकरणात सोमवारी सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहची एनसीबीने सोमवारी चौकशी केली. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 12 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपत होती, ती वाढवून आता 6 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.

Published by: Priya Lad
First published: September 22, 2020, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading