नैरोबी, 30 नोव्हेंबर : पोस्टमॉर्टेम (postmortem) करताना मृतदेहाची अचानक हालचाल होणं, पोस्टमॉर्टेम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेहानं अचानक हात धरणं किंवा तो धाडकन उठून बसणं... एखाद्या हॉरर फिल्म किंवा सीरिअलमध्ये आपण पाहिलेली अशी काही दृश्यं. मात्र केनियात अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. पोस्टमॉर्टेम करता करता शवगृहात मृतदेह उठूनच बसला आणि सर्वांनाच घाम फुटला.
पीटर किगेन असं या व्यक्तीचं नाव आहे. मीडिया रिपोर्टनुसार 32 वर्षांचा पीटर किगेनला पोटाचा आजार होता. घरात तो पडलाही होता त्यानंतर त्याच्या कुटुंबानं त्याला तात्काळ कॅपलेटेट रुग्णालयात दाखल केलं.
किगेनचा भाऊ केविन कपकुराईनं स्थानिक वृत्तपत्राला सांगितल्यानुसार, "आम्ही किगेनला घेऊन ते कॅपलेटेट रुग्णालयात गेलो. जे डॉक्टर त्याला तपासणार होते त्यांनी आधी रुग्णाची नोंदणी करायला सांगितली आणि नंतर मी पुन्हा गेलो तेव्हा नर्सनं माझा भाऊ मृत झाल्याचं सांगितलं. रुग्णालयात आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता असं नर्स म्हणाली"
हे वाचा - बापरे! तब्बल 50 वर्षे नाकात अडकलेलं नाण डॉक्टरांनी काढलं
केविन पुढे म्हणाला, "माझ्या भावाला शवगृहात नेण्यापूर्वी माझ्या हातात नर्सनं काही डॉक्युमेट्सही दिले. त्यानंतर मृतदेह शवागृहात नेण्यात आला. शवगृहातील कर्मचारी भावाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाची तयारी करत होते. त्याआधीच भाऊ उठून बसला"
"शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याचा पाय कापला होता. शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. माझा पुतण्या पुन्हा शुद्धीवर आला, तो वेदनेनं व्याकूळ झाला होता", असं किगेनचे काका डेनिस लँजड म्हणाले.
रुग्णालयानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप किगेनच्या कुटुंबानं केला मात्र रुग्णालय प्रशासनानं हे आरोप फेटाळेल आहेत. मृताच्या कुटुंबानं डेथ सर्टफिकेटचीही वाट पाहिली नाही आणि त्याचा मृत्यू झाला असं समजून ते त्याला स्वतःच शवगृहात घेऊन गेले.
हे वाचा - मुक्या जीवाला मारताच शिकारीच झाला बंदुकीचा शिकार; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गिलबर्ट शेरयुट म्हणाले, किगेनला तपासणारे डॉक्टर दुसऱ्या एका गंभीर रुग्णाला पाहत होते. त्यांनी किगेनच्या नातेवाईकांना थोडा वेळ देण्यास सांगितलं. मात्र डॉक्टर खूप वेळ लावत आहे, म्हणून त्यांनी स्वत:च रुग्णाला शवागृहात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. शवागृहातील कर्मचाऱ्याला ती व्यक्ती जिवंत असल्याची लक्षणं दिसून आली. त्यानंतर त्याला वॉर्डमध्ये हलवलं आणि त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले"
"माझ्यासोबत जे काही झालं त्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी कुठे आहे हेसुद्धा मला माहिती नव्हतं. माझा जीव वाचवला यासाठी मी आयुष्यभर देवाला कधीच विसरणार नाही", असं म्हणत किगेननं देवाचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Postmortem, World news