बापरे! तब्बल 50 वर्षे नाकात अडकलेलं नाण डॉक्टरांनी काढलं

सोव्हिएत काळातील हे नाणं होतं, त्या वेळी ते वापरात नव्हतं. त्यावर हातोडा आणि कोयता ही चिन्हं असावं.

सोव्हिएत काळातील हे नाणं होतं, त्या वेळी ते वापरात नव्हतं. त्यावर हातोडा आणि कोयता ही चिन्हं असावं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : लहान मुले कधी काय उपदव्याप करून ठेवतील सांगता येत नाही. पेन्सिल नाकात घालणे, नाणं गिळणं असे उपदव्याप केल्याच्या घटना आपण ऐकत असतो, वाचत असतो. जगभरात सगळी मुले सारखीच... मग ती भारतातली असो रशियातली असो किंवा अमेरिकेतील. रशियातील अशाच एका मुलाने केलेला उपद्व्याप चक्क 50 वर्षानंतर उघडकीला आला, आणि त्यावर उपचार करून डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात, त्याचीच प्रचिती या उदाहरणावरून येते. रशियातील एका 59 वर्षांच्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानं त्याची वैदयकीय तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला. कारण या व्यक्तीच्या नाकात उजव्या बाजूला चक्क एक नाणं अडकलं होतं. डॉक्टरांनी जेव्हा त्याला याबाबत कल्पना दिली त्या वेळी त्याला आठवलं की, लहान असताना म्हणजे साधारण सहा-सात वर्षांचा असताना त्याने खेळताना चुकून नाणं नाकात घातलं होतं; पण आई ओरडेल या भीतीने त्याने कुणालाच काहीच सांगितलं नाही. दरम्यान त्याला काहीच त्रास होत नसल्याने हळूहळू तो ती घटना विसरून गेला आणि ते नाणं तब्बल पाच दशकं म्हणजे 50 वर्षं तिथंच राहिलं. हे वाचा-Shocking! Toilet मध्ये गेलेल्या तरुणीच्या गर्भातून अचानक निघालं बाळाचं डोकं आणि. विशेष म्हणजे इतक्या वर्षांत त्याला कधीही त्याचा त्रास जाणवला नव्हता. इतकी वर्षे त्याला श्वास घेण्यात कसा काही त्रास झाला नाही, याचं आश्चर्य वाटतं ना? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे, त्याला नाकाच्या आतल्या बाजूला असलेल्या नलिकांमध्ये ऱ्हीनोलिथीस नावाचे खडे तयार झाले. त्यामुळे त्याच्या श्वासोच्छवास करण्याच्या क्षमतेवर काहीही परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हे नाणं बाहेर काढलं, असे मेट्रोने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सोव्हिएत काळातील हे नाणं होतं, त्या वेळी ते वापरात नव्हतं. त्यावर हातोडा आणि कोयता ही चिन्हं असावं. त्याकाळी सोव्हिएट संघ रशियाचं ते चिन्ह होतं; पण इतकी वर्षे मानवी शरीरात राहिल्याने त्यावरील चिन्हं अस्पष्ट झाली होती, असंही या वृत्तात म्हटलं आहे. अर्थात, अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही. 2015 मध्ये 51 व्या वर्षी इंग्लंडमधील सरे परगण्यातील स्टीव्हन इस्टन यांच्या नाकात नेमबाजीतील डार्टचा भाग सापडला होता. 44 वर्षांनी त्यांच्या नाकात काहीतरी अडकल्याचे उघडकीस आले होते. ते नाक शिंकरत असताना आलेल्या अडथळ्यामुळे ही घटना उघडकीस आली होती.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: