मुंबई, 28 नोव्हेंबर : प्राण्यांची शिकार (animal hunting) करणं कायद्यानं गुन्हा आहे. तरीदेखील कित्येक लोक आपल्या हौशेसाठी, मजेसाठी प्राण्यांची शिकार करतात. पण म्हणतात ना जैसी करनी वैसी भरनी, तसाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यामध्ये मुक्या जीवाला मारताच शिकारीच (hunter) स्वत:च्या बंदुकीचा शिकार झाला आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक शिकारी शिकार करताना दिसतो आहे. ज्या क्षणी शिकारी शिकार करतो त्याच्या दुसऱ्याच क्षणी त्याला त्याची शिक्षाही मिळते, असा हा व्हिडीओ आहे. तुम्ही जसं देता तसंच तुम्हालाही मिळतं, असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी याला दिलं आहे.
Karma has no menu..
— Susanta Nanda (@susantananda3) November 28, 2020
You get served what you deserve.
(Keep the sound on) pic.twitter.com/49KwEcatI2
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एक व्यक्ती शिकार करतो आहे. काही अंतरावरच असलेल्या प्राण्यावर तो आपल्या बंदुकीचा नेम धरतो. निशाणा साधतो. एक गोळी त्या प्राण्यावर झाडतो. शिकाऱ्याचा नेमही अचूक लागतो. त्याच्याजवळ असलेल्या एका लाकडाच्या आधारावर तो बंदूक उभी करतो आणि ज्या प्राण्याची शिकार केली त्याच्या दिशेनं तो जातो. काही अंतरापर्यंत तो जातो आणि ज्या लाकडाच्या आधारे तो बंदूक उभी करतो ते लाकूड पडतं सोबत बंदूकही पडते आणि बंदुकीतून आपोआप गोळी सुटते. बंदुकीतून बाहेर पडलेली गोळी थेट लागते ती त्या शिकाऱ्याला. त्याचा पायावर ही बंदूक लागते आणि तो जमिनीवरच कोसळतो. त्यानंतर कसाबसा स्वत:ला सावरत तो उभा राहतो. हे वाचा - भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO आपल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागतात ती अशी. एका मुक्या जीवाची त्यानं निर्दयीपणं शिकार केली. त्याच्या जीवाचा थोडाही विचार केला नाही. अगदी हुशारीनं त्याच्यावर बंदूक ताणली आणि त्याचा जीव घेतला. पण मुक्या जीवाचा जीव घेताच दुसऱ्याच क्षणी त्यालाही त्याची शिक्षा मिळाली. ज्या बंदुकीची गोळी लागून त्या प्राण्याला वेदना झाल्या त्या किती असतील याची कल्पना या शिकाऱ्याला आलीच असेल. व्हिडीओ पाहिल्यावर तसा हा एखाद्या फिल्ममधील असल्यासारखा वाटतो आहे. मात्र प्रत्यक्ष आयुष्यातची LAW OF KARMA लागू व्हावा. ज्यानं जे केलं आहे, त्याला तशीच शिक्षा मिळावी अशा प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

)







