मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रात्र-रात्रभर जागून खेळायचा Mobile Games, झोप न मिळाल्याने झाला मृत्यू

रात्र-रात्रभर जागून खेळायचा Mobile Games, झोप न मिळाल्याने झाला मृत्यू

रात्रभर मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागल्यामुळे अनेक दिवस न झोपल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

रात्रभर मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागल्यामुळे अनेक दिवस न झोपल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

रात्रभर मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागल्यामुळे अनेक दिवस न झोपल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

    थायलंड, 27 ऑगस्ट : मोबाईल (Mobile) आणि ऑनलाईन गेमचं (Online Games) व्यसन (Addiction) असं भिनतं की त्यासाठी वाटेल ते करायला मुलं तयार होतात. आपली तहान आणि भूक विसरून गेममध्ये मशगूल असणारी मुलं तर आपण पाहतोच. पण आता मुलं झोपदेखील विसरत असल्याचं दिसतं. रात्र-रात्रभर जागून मोबाईल गेम (Mobile Game) खेळणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाचा (18 year old boy) झोपेच्या अभावामुळे (Lack of sleep) मृत्यू (death) झाला आहे. अनेक दिवस न झोपल्याचा या मुलाच्या शरीरावर परिणाम झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. लागलं होतं गेमचं व्यसन थायलंडमध्ये राहणाऱ्या एका 18 वर्षांच्या तरुणाला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसनच जडलं होतं. दिवसभर कधी एकदा अत्यावश्यक कामं उरकून गेम खेळतो, असं त्याला व्हायचं. रात्री तो न झोपता गेम खेळत बसायचा. त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती. आपल्या मुलाला ऑनलाईन गेमची आवड आहे, हे त्यांना माहित होतं. मात्र तो अजिबात न झोपता पूर्ण रात्र गेम खेळत राहतो, याची त्यांना जाणीव नव्हती. आपण शेजारच्या खोलीत झोपत असल्यामुळे मुलगा रात्रभर काय करतो, याची आपल्याला कधीच कल्पना आली नसल्याचं त्याच्या आईनं सांगितलं. रात्री त्याच्या खोलीतील दिवे सुरु असायचे आणि त्याच्या बाथरूमच्या दाराचेही आवाज यायचे, असं त्याची आई म्हणते. त्याला रात्री अंघोळ करण्याची सवय होती. त्यामुळे अंघोळ करून तो झोपला असेल, असं वाटायचं. मात्र गेले कित्येक दिवस तो झोपलाच नाही, ही बाब त्याच्या आईवडिलांना माहित नसल्याचं समोर आलं आहे. हे वाचा -Kabul Airport Blast: 'मानवी अवयव हवेत उडत होते..', अंगावर काटा आणणारा अनुभव झोपेच्या अभावामुळे मृत्यू एक दिवस सकाळी त्याच्या खोलीतून कसलाही आवाज येत नसल्यामुळे आईनं त्याला हाक मारली. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. काही वेळाने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर हा मुलगा बेडवर आडवा पडल्याचं दिसलं. त्याचा जीव गेला होता आणि मोबाईल शेजारीच पडला होता. कित्येक दिवस न झोपल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीदेखील थायलंडमध्येच मोबाईल गेमच्या व्यसनापायी झोप न झाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Death, Games, Mobile, Pubg game

    पुढील बातम्या