मराठी बातम्या /बातम्या /Viral /गरम वाफ, गरम पाण्यानंतर आता चक्क आगीचा गोळा; कोरोनापासून बचावाच्या भयंकर उपायाचा खतरनाक VIDEO

गरम वाफ, गरम पाण्यानंतर आता चक्क आगीचा गोळा; कोरोनापासून बचावाच्या भयंकर उपायाचा खतरनाक VIDEO

कोरोनापासून बचावाच्या उपायाचा हा व्हिडीओ पाहूनच शॉक बसेल.

कोरोनापासून बचावाच्या उपायाचा हा व्हिडीओ पाहूनच शॉक बसेल.

कोरोनापासून बचावाच्या उपायाचा हा व्हिडीओ पाहूनच शॉक बसेल.

मुंबई, 08 मे : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी (Coronavirus) लोक काय काय नाही करत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत, त्यातून कोरोनापासून वाचण्यासाठी उपाय सांगितले जात आहेत. त्यानुसार कुणी गरम पाणी पित आहे, कुणी गरम पाण्याची वाफ घेत आहे, कुणी हळद घालून दूध पित आहे, कुणी गुळण्या करत आहे. पण आता तर चक्क असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत आहे, जो पाहूनच धडकी (Shocking video) भरेल. कोरोनापासून बचावाचा हा भयंकर असा उपाय ही महिला करताना दिसते आहे.

सोशल मीडियावर अशा महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे जी गरम पाण्याची वाफ घेत नाही आहे किंवा गरम पाणी पित नाही आहे. तर चक्क आगीचे गोळे खाताना दिसते आहे (Woman eating fireball). हा व्हिडीओ पाहूनच शॉक बसतो.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला खुर्चीवर बसली आहे. तिच्यासमोरील टेबलावर एक प्लेट आहे आणि त्या प्लेटमध्ये चक्क आगीचे गोळे ठेवले आहेत. महिला चमच्याने एक एक आगीचा गोळा उचलते आणि आपल्या तोंडात टाकते. ती तो गोळा चावतानाही दिसते. असं करत ती प्लेटमधील सर्व आगीचे गोळे फस्त करते. जणू काही रसगुल्ले, गुलाबजामच आहेत, असेच ती सहजपणे आगीचे गोळे खाताना दिसते आहे.

हे वाचा - छोट्याशा बदकामुळे वाघाची चांगलीच दमछाक; नेमकं काय केलं पाहा VIDEO

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी सोबत कॅप्शनही दिलं आहे. "वाफ घेतल्यानंतर, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानंतर, हळदीचे दूध प्यायल्यानंतर, दररोज गरम पाणी प्यायल्यानंतर आता हा शेवटचा उपाय राहिला आहे. कोरोना जिवंतच भस्म होऊन जाईल" "तुम्ही मात्र असं करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त कोरोना लस घ्या", असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Viral, Viral videos