मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महिला डान्सर Rock, प्रेक्षक Shocked! डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; VIDEO पाहूनच हैराण व्हाल

महिला डान्सर Rock, प्रेक्षक Shocked! डान्स करताना ऑन स्टेज बदलला ड्रेस; VIDEO पाहूनच हैराण व्हाल

महिला डान्सरचा ऑन स्टेज परफॉर्म करत कपडे बदलतानाचा हा व्हिडीओ (dancer woman changed dress during performance on stage) म्हणजे मोठा आश्चर्याचा धक्का आहे.

महिला डान्सरचा ऑन स्टेज परफॉर्म करत कपडे बदलतानाचा हा व्हिडीओ (dancer woman changed dress during performance on stage) म्हणजे मोठा आश्चर्याचा धक्का आहे.

महिला डान्सरचा ऑन स्टेज परफॉर्म करत कपडे बदलतानाचा हा व्हिडीओ (dancer woman changed dress during performance on stage) म्हणजे मोठा आश्चर्याचा धक्का आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 एप्रिल: सध्या डान्स (Dance) हा फक्त डान्स (Dance video) राहिलेला नाही. तर डान्सच्या पलिकडे खूप काही झालं आहे. डान्स (Shocking dance video) हा आता एका वेगळ्या उंचीवर गेलेला आहे. डान्स करताना डान्सर असं काही करतो की एक तर त्यामुळे हृदयाचा ठोका चुकतो, धडकी भरते, घाम फुटतो, डोळ्यांतून अश्रू येतात किंवा आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्या असाच आश्चर्याचा धक्का देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला डान्सरने चक्क स्टेजवर सर्व प्रेक्षकांसमोरच आपला ड्रेस बदलला (dancer woman changed dress during performance on stage) आहे.

डान्स करताना तसे एकाचवेळी ड्रेस बदलले जातात. पण यासाठी एकतर तो डान्सर गाणं सुरू असतानाच मध्येच बॅक स्टेज जाऊन किंवा बॅक डान्सरच्या आड किंवा फार फार कशाच्या तरी आड राहूनच ड्रेस बदलतो. पण यापैकी काहीही न करता ऑन स्टेज परफॉर्म करताना चक्क सर्वांसमोर ड्रेस बदलणं आणि ते कुणालाही न समजणं म्हणजे एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. हो की नाही. अशीच जादू एका महिला डान्सरने केली आहे. हा व्हिडीओ पाहून  हे नेमकं केलं तरी कसं? हे कसं शक्य आहे? असेच प्रश्न तुम्हाला तुम्हाला पडतील.

या व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला एक पुरुष डान्ससाठी तयार आहे. त्यानंतर त्याची महिला पार्टनर तिथं येते. सामान्यपणे डान्स करत असताना दोघांचाही ड्रेस सारखा असतो. पण इथं पुरुषाने ब्लॅक-गोल्डन ड्रेस आणि महिला ब्लू-ब्लॅक ड्रेस घालून आली आहे. तिचा पार्टनरसुद्धा तिला चुकीचा ड्रेस घालून आल्याचं सांगतो. तेव्हा ती त्यालाच ड्रेस बदलून यायला सांगते.

हे वाचा - अरे यांना कुणीतरी आवरा! घाई म्हणून ट्रकखालूनच बाईक नेली; चालकाचा प्रताप VIRAL

त्यानंतर मग दोघंही डान्स करण्यासाठी स्टेजवर येतात. काही क्षण डान्स केल्यानंतर महिलेच्या ड्रेसचा रंग बदलतो. ब्लू-ब्लॅक ड्रेसचा गोल्डन-ब्लॅक ड्रेस बनतो. विशेष म्हणजे महिला स्टेजवरच प्रेक्षकांसमोर नाचता नाचता आपला ड्रेस बदलते. महिलेचं हे अनोखं करतब पाहूनच टाळ्यांचा कडकडाट होतो.  व्हिडीओ पाहून तर आपल्या डोळ्यांवरही आपला विश्वास बसत नाही. कारण आपली डोळ्यांची पापणी हलेपर्यंत ही महिला कधी आपला ड्रेस बदलते ते समजत नाही. तिथे उपस्थित प्रेक्षकही असेच शॉक होतात. किंबहुना तिच्यासोबत जो मेल पार्टनर डान्स करत होता तोसुद्धा हैराण झाला.

हे वाचा - तरुणाचा पाय तोंडात धरला आणि...; बिबट्याने केलेल्या भयंकर हल्ल्याचा VIDEO VIRAL

महिलेनं ही कमाल नेमकी केली तरी कशी हे पाहण्यासाठी आता तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ परत परत पाहात असेल. तुम्हाला जर का हे कोडं उलगडत नसेल तर मग दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्या. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तीसोबत ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांना तरी याचं उत्तर सापडतं का ते पाहा.

First published:

Tags: Dance video, Dancer, Shocking viral video, Social media viral, Viral, Viral videos