मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाबोव! गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO

बाबोव! गावात शिरलेल्या मगरीला पकडतानाचा थरार, पाहा VIDEO

मगरीला (crocodile) पकडतानाचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk
वडोदरा,16 जानेवारी: गेल्या कित्येक वर्षांपासून माणसांनी जंगलेच्या जंगलं तोडून नष्ट केली आहेत. त्यामुळे आता अनेक जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरताना आपल्याला दिसतात. मग यामध्ये अगदी वाघापासून अगदी सर्वच प्राण्यांचा समावेश होतो. मग त्यांना मानवी वस्तीतून पकडून पुन्हा त्यांना जंगलात नेवून सोडावं लागतं. असाच मगरीला पकडतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रिस्क्यू टीमचे काही जवान या मगरीला पकडताना दिसतं आहे. गुजरातमधील वडोदराजवळील विरोद या गावात मगर शिरल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी प्राणी मित्रांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मगरीला पकडायला आलेल्या रिक्स्यु दलाच्या काही जवानांनी या मगरीला सुखरुप पकडलं आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही गावकरी, लहान मुलं आणि महिला देखील या व्हिडिओत दिसत आहे. तर काही गावकरी या घटनेचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. 44 सेकंदाच्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन लोकं मगरीला मजबुत दोरी तोंडाला बांधुन सुरक्षितपणे पिंजऱ्यात कैद करताना दिसत आहेत. रिस्क्यु विभागाच्या जवानांनी या मगरीला पकडल्यानंतर काही वेळातच वन विभागाच्या ताब्यात दिलं आहे. या मगरीच्या रिस्क्युचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अवघ्या तीन तासात पंधरा हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 631 लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.
First published:

Tags: Gujrat

पुढील बातम्या