मुंबई, 15 जानेवारी : प्राणी-पक्ष्यांना खायला देणं अनेकांना आवडतं. पण जर त्या प्राण्यांना आवडलं नाही तर मग काय होऊ शकतं. याचंच उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतो आहे. जिथं एक व्यक्ती एका छोट्या हत्तीला (Baby Elephant) ऊस भरवतो आणि त्यानंतर तो हत्तीन नेमकं काय करतो, त्याचा हा व्हिडीओ.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर सुशांता नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरू हसाल.
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती आपल्या हातात ऊस घेऊन येतो. आपल्यासाठी काहीतरी खाण्यासाठी आणलं आहे म्हणून छोटा हत्ती त्याच्याकडे धावत येतो. हत्ती येताच व्यक्ती खाली बसतो आणि आपल्या हातातील ऊस हत्तीच्या सोंडेत देतो. हत्ती सोंडेत ऊस घेऊन तोंडात टाकतो. पण काही क्षणातच तो त्या व्यक्तीकडे पाठ फिरवतो आणि आपला पाठीमागचा एक पाय त्या व्यक्तीच्या दिशेनं भिरकालतो आणि थोडं पुढे जाऊन तो तोंडात घेतलेला ऊसही फेकून देतो.
व्हिडीओतून स्पष्ट होतं की हत्तीला ऊस आवडलेला नाही. तोंडात त्याची चव लागत नाही, त्याला काही ऊस आवडत नाही म्हणून तो त्या व्यक्तीला लाथ मारतो आणि त्याच्यावर रागवून निघून जातो. यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.