जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : कॉफी सोबतच या 5 सवयी वाढवू शकतात चेहऱ्यावरील सुरकुत्या

Skin Care : कॉफी सोबतच या 5 सवयी वाढवू शकतात चेहऱ्यावरील सुरकुत्या

Skin Care : कॉफी सोबतच या 5 सवयी वाढवू शकतात चेहऱ्यावरील सुरकुत्या

त्वचेशी संबंधित समस्या अनेकदा त्रासदायक असतात. जर तुम्हाला कमी वयात सुरकुत्या येण्याची समस्या असेल तर त्यामागील कारणांमध्ये वाईट सवयींचा समावेश होतो. या सवयींबद्दल जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर : त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात बाहेरचा आणि नाजूक भाग आहे. त्वचेच्या समस्या अनेकदा त्रासदायक असतात. जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा. सुरकुत्या वृद्धत्वाशी संबंधित आहेत. याची अनेक कारणे असू शकतात आणि या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक उत्पादने बाजारात मिळतील. परंतु ही उत्पादने काहीवेळा त्वचेसाठी हानिकारकदेखील ठरू शकतात. जर तुम्हाला कमी वयातच सुरकुत्या येण्याची समस्या असेल तर काही चुकीच्या सवयी देखील याचे कारण असू शकतात. जसे की, चहा किंवा कॉफीचे अधिक सेवन करणे. आज आम्ही तुम्हाला या चुकीच्या सवयींबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया अशा इतर सवयींबद्दल ज्या सुरकुत्याची समस्या वाढवू शकतात.

Ginger For Skin : आल्याचा एक तुकडा दूर करू शकतो पिंपल्स आणि रिंकल्स, असा करा वापर

या सवयीमुळे येतात चेहऱ्यावर सुरकुत्या हेल्थलाइनच्या मते, सुरकुत्या आणि बारीक रेषा अनेक घटकांवर अवलंबून असतात. ज्यामध्ये जीन्स आणि जीवनशैलीचा समावेश आहे. आपण आपले जीन्स बदलू शकत नाही. परंतु आपण आपली जीवनशैली बदलू शकतो. जाणून घ्या त्या सवयींबद्दल ज्यांमुळे सुरकुत्याची समस्या उद्भवू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

सूर्यप्रकाश - दीर्घकाळ सूर्याच्या संपर्कात राहणे आपल्या त्वचेसाठी हानिकारक आहे. यामुळे आपली त्वचा टॅन किंवा कोरडी तर होऊ शकतेच पण उन्हामुळे सुरकुत्याही पडू शकतात. त्यामुळे सूर्याच्या संपर्कात येण्यापूर्वी त्वचा झाकून ठेवा. अयोग्य आहार - योग्य आहार न घेतल्यानेही हा त्रास वाढू शकतो. जास्त साखर, जंक किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने सुरकुत्या येण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच फळे, भाज्या, संपूर्ण धान्य इत्यादी योग्य आहार घ्या. बराच वेळ मेकअप न काढणे - जर तुम्ही बराच वेळ मेकअप काढला नाही तर त्वचेचा नैसर्गिक पोत नष्ट होतो, ज्यामुळे सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे जास्त वेळ मेकअप ठेवू नका.

डिलिव्हरीनंतर चेहऱ्यावर काळे डाग आलेत? चिंता सोडा, करा एक्स्पर्स्टसने सांगितलेले हे उपाय

कमी झोप - पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुमची झोप नीट झाली नाही तर तुम्हाला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुरकुत्याही येऊ शकतात. म्हणूनच रोज किमान सहा ते आठ तासांची झोप घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात