जबलपूर, 01 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) रुग्णांना श्वसनाच्या समस्या जास्त उद्भवत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची (Oxygen) मागणी वाढली आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen crisis) निर्माण होतो आहे. ऑक्सिजन पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. अगदी इतर देशही भारताला ऑक्सिजन पुरवण्यासाठी सरसावले आहेत. अशात आता मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात मात्र असं कोविड वॉर्ड तयार करण्यात आलं आहे जे स्वतः ऑक्सिजन तयार करतं (Covid ward which create oxygen on it's own).
जबलपूरच्या नेताची सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज रुग्णालयात असं कोविड वॉर्ड तयार करण्यात आलं आहे, ते स्वतः ऑक्सिजन तयार करतं. विशेष म्हणजे हे कोविड वॉर्ड पोर्टेबल आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकतं. या कोरोना वॉर्डात दाखल केलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची समस्या उद्भवणार नाही.
हे वाचा - अजबच! ऑक्सिजनसाठी पिंपळाच्या झाडाखाली झोपले रुग्ण, प्रकृती स्थिर असल्याचा दावा
इन्फ्लेटेबल स्ट्रक्चर मटेरियलचा वापर करून हे वॉर्ड तयार करण्यात आलं आहे. यामध्ये वीज आणि पाण्याच्या सुविधा असल्यास अवघ्या काही क्षणातच हे वॉर्ड कुठेही तयार करता होऊ शकतं. ऑक्सिजनची एअर सेपरेशनची युनिटची सुविधा यामध्ये आहे. या वॉर्डमध्ये 20 बेड्स आहेत. याशिवाय ऑक्सिजन, हायफ्लो ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशी वैद्यकीय उपकरणांसह इतर अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे.तसंच टॉयलेट आणि वॉशरूमचीही सोय आहे.
हे वाचा - Positive News : हृदयात गंभीर बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बालकाने कोरोनाला हरवलं
नई दुनियाशी बोलताना नेताजी सुभाष चंद्र बोस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन डॉ. प्रदीप कसार यांनी सांगितलं, या आधुनिक कोरोना वॉर्डमध्ये गंभीर रुग्णांनाही दाखल करता येईल. गरज पडल्यास एक वॉर्ड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत करता येईल. ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला तर तिथं असे वॉर्ड दोन ते तीन दिवसांत तयार करता येऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Oxygen supply