कोलकाता, 27 सप्टेंबर : कोरोनामुळे वास न येणं, चव न लागणं अशा समस्या काही रुग्णांना जाणवत होत्या (Post covid complication). कोरोनाची ही लक्षणं कोरोनातून (Corona symptoms) बरं झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये (Corona recoverd patient problem) कायम राहत होती. पण आता तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना आणखी एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर फक्त चव, वास नाही तर आता आवाजही जातो आहे (Corona recovered pateint loss voice). पश्चिम बंगालच्या कोलकात्यात (Kolkata) असे रुग्ण आढळून आले आहेत.
कोलकात्यातल्या कोविड रुग्णांना (Covid -19) त्यातून बरं झाल्यानंतर एका वेगळ्याच संकटाला तोंड द्यावं लागत आहे. कोविडमधून बरं झाल्यानंतर अनेकांचा आवाज बिघडत असल्याचं दिसून आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसांचं फायब्रॉसिस (Lung Fibrosis) किंवा अनेक आठवडे आवाजच न आल्यामुळे आवाजात काही बिघाड होऊ शकतो. पण त्याचं कारण सर्वस्वी कोरोना संसर्ग हे नाही. पीडित व्यक्तीच्या घशात संसर्ग झालेला असू शकतो आणि त्यामुळे ही समस्या असू शकते.
मात्र ही तात्पुरती समस्या असल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. CMRI हॉस्पिटलच्या पल्मोनॉलॉजी (Pulmonology) विभागाचे संचालक राजा धर यांनी सांगितलं, की अशा प्रकारे आवाजात (Voice Problems) काही बिघाड होत असला, तरी ती समस्या दीर्घ काळ राहणार नाही. काही दिवसांनंतर आवाज व्यवस्थित होतो.
हे वाचा - फुफ्फुसांच्या गंभीर आजाराची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आर. एन. टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचे सौरेन पांजा यांनी सांगितलं, लोअर रेस्पिरेटरी सिस्टीमसोबतच (Lower Respiratory System) कोविडच्या काही पीडितांमध्ये अपर रेस्पिरेटरी सिस्टीमवरही (Upper Respiratory System) परिणाम झाला आहे. त्यासोबतच घशाच्या इन्फेक्शनमुळे सूजही येऊ शकते. त्यामुळे आवाज काही काळासाठी पूर्णतः जाऊ शकतो. असं मानलं जात आहे, की कोविडचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत आवाजाची समस्या राहू शकते. कोणाचाही आवाज यामुळे कायमचा जाणार नाही; मात्र ज्यांना अशी समस्या निर्माण झाली, त्यांना डिप्रेशनचा (Depression) त्रास झाला.
पांजा यांनी असं सांगितलं, की 'फुप्फुसांची क्षमता कमी होते, म्हणून बोलणं कमी होतं. ज्यांना बोलण्यात अडचण येते, अशांना आम्ही सल्ला देतो, की सलग बोलू नका. मध्ये थोडा ब्रेक घ्या. थोडा कालावधी गेल्यानंतर यात सुधारणा होत जाते. कारण संसर्ग तोपर्यंत बरा होतो.'
दरम्यान, इंटर्नल मेडिसीन कन्सल्टंट अरिंदम विश्वास यांनी सांगितलं, की कोविडमुळे व्होकल कॉर्ड्सना (Vocal Chords) सूज येत आहे. त्यामुळे आवाजाची समस्या निर्माण होत आहे. यामुळे आवाज कर्कश बनतो. सूज आली असेल, तर स्टेरॉइड्सचा वापर करणं गरजेचं आहे. सूज कमी झाल्यावर आवाज परत येतो, असंही त्यांनी सांगितलं.
हे वाचा - चिंताजनक..! कोरोनामुळं वजन कमी होणं आणि कुपोषणाचा धोका वाढलाय
पोस्ट कोविड अर्थात कोविड होऊन गेल्यानंतर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास दीर्घ काळ होत असल्याची निरीक्षणं वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये नोंदवण्यात आली आहेत. त्यात शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांच्या समस्यांचा समावेश आहे. यावर अद्याप संशोधन सुरू असल्याने रुग्णांनी आपल्या लक्षणांचं बारीक निरीक्षण करणं आवश्यक आहे, जेणेकरून डॉक्टर्स त्यावरून काही अंदाज लावू शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus