मराठी बातम्या /बातम्या /heatlh /फुफ्फुसांच्या गंभीर आजाराची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

फुफ्फुसांच्या गंभीर आजाराची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

फुफ्फुसांच्या समस्यांशी संबंधित लक्षणे वेळेत ओळखली गेली तर मोठी आपत्ती टाळली जाऊ शकते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवलीन बत्रा यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये फुफ्फुसांच्या (lung) काही लक्षणांकडे बारकाईने पाहण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा आजार कॅन्सर (cancer) बनत नाही तोपर्यंत त्याला त्याचे गांभीर्य समजत नाही. हे वाक्य आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी (Lung health) देखील तंतोतंत खरे ठरते. जर फुफ्फुसांच्या समस्यांशी संबंधित लक्षणे वेळेत ओळखली गेली तर मोठी आपत्ती टाळली जाऊ शकते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लवलीन बत्रा यांनी त्यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये फुफ्फुसांच्या (lung) काही लक्षणांकडे बारकाईने पाहण्याचा सल्ला दिला आहे.

छातीत दुखणे -

एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ छातीत दुखणे, हे मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते. विशेषत: खोकला किंवा श्वासोच्छवासाच्या वेळी छातीत दुखणे दुर्लक्ष करू नका.

श्लेष्मा -

तुम्हाला माहीत आहे का, की छातीत श्लेष्मा संसर्ग आणि जळजळीकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या छातीत एक महिना किंवा त्याहून अधिक काळ श्लेष्माची समस्या असेल तर ते काही रोगाचे लक्षण असू शकते.

अचानक वजन कमी होणे -

कोणत्याही विशेष आहार किंवा व्यायामाशिवाय अचानक वजन कमी होणे ही बाब धोकादायक आहे. वास्तविक ते शरीराच्या आत वाढणाऱ्या ट्यूमरच्या धोक्याचे संकेत असू शकते.

हे वाचा - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला सून हवीय; त्याच्या अटी वाचून मुली म्हणाल्या…

श्वासात बदल -

जर तुम्हाला श्वास घेण्यात अडचण येत असेल तर ते फुफ्फुसाच्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. खरं तर, फुफ्फुसातील ट्यूमर किंवा कार्सिनोमामुळे, फुफ्फुसांमध्ये तयार होणारा द्रव हवेचा मार्ग रोखतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

हे वाचा - Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ जागांसाठी भरती; मिळणार 2,60,000 रुपये पगार

सतत खोकला किंवा खोकल्यातून रक्त -

सलग आठ आठवडे खोकला किंवा खोकल्यातून रक्त पडणे ही गंभीर बाब आहे. यातून एखाद्या व्यक्तीची खराब श्वसन प्रणाली दिसून येते. असे झाल्यास, आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि वेळेत उपचार घ्यावेत.

First published:

Tags: Health, Health Tips