कैद्यांवरही होत नसेल असा कोरोना रुग्णांवर अत्याचार; उपचार नाहीच पण दिला जातोय भयानक मृत्यू

कैद्यांवरही होत नसेल असा कोरोना रुग्णांवर अत्याचार; उपचार नाहीच पण दिला जातोय भयानक मृत्यू

एकिकडे कोरोना रुग्णांना (corona patient) वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांना मुद्दाम मृत्यूच्या दाढेत ढकललं जातं आहे, असा दावा केला जातो आहे.

  • Share this:

 पाँगयाँग, 03 नोव्हेंबर :  अमेरिकेसारखी महासत्ता असलेल्या देशांसह जगातील मोठमोठ्या देशांचं कोरोनाव्हायरसनं (coronavirus) कंबरडं मोडलं आहे. बहुतेक देशांमध्ये कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे, मात्र ज्या चीनमधून जगभर कोरोनाव्हायरस पसरला त्या चीनच्या अगदी शेजारील देश उत्तर कोरिया (North Korea) आमच्या देशात कोरोना नाहीच अस  म्हणतं आहे. मात्र आता इथली कोरोनाबाबतची भयानक स्थिती समोर येते आहे.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un)  आपल्या देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा करतात. मात्र काही रिपोर्टनुसार दक्षिण कोरियामध्ये कोरोनाग्रस्तांना जाणूनबुजून मृत्यूच्या दाढेत ढकललं जातं आहे. कोरोना रुग्णांना मृत्यू दिला जातो आहे.

उत्तर कोरियामध्ये कोरोना रुग्णांसाठी एक सिक्रेट क्वारंटाइन कॅम्प तयार करण्यात आलं आहे. उत्तर कोरियाने चिनी सीमेजवळ सिक्रेट क्वारंटाइन कॅम्प तयार केलं आहे. हेल्पिंग हँडस कोरिया ही संस्था चालवणारे सामाजिक कार्यकर्ते टिम पीटर्स यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट शी बोलताना यााबाबत माहिती दिली आहे.

टिम पीटर्स म्हणाले, "उत्तर कोरियात कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर आहे. सिक्रेट आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांपर्यंत त्यांच्या कुटुंबाला खाणंपिणंही पोहोचवणं शक्य होत नाही. अनेक अडचणी येतात. किम जोंग उन सरकार कोरोना रुग्णांना अगदी कमी जेवण देतं किंवा जेवणच देत नाही. सिक्रेट आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या कित्येक लोकांचा मृत्यूही झाला आहे, असं मला समजलं"

हे वाचा - मानलं राव यांना! नागरिकांची भीती घालवण्यासाठी पंतप्रधानांनीच घेतली COVID-19ची लस

चीनच्या शेजारील देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचं समोर आलं आहे, यावर विश्‍वास ठेवणं जगाला कठीण जात आहे. आर्थिक निर्बंध आणि कमकुवत वैद्यकीय व्यवस्थेमुळे उत्तर कोरियाची 40 टक्के जनता कुपोषित आहे आणि या रोगाला ते  सहजपणे बळी पडू शकते. अशा परिस्थितीमुळे, उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंभीर संकट उद्भवू शकतं आणि बरेच लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे वाचा - दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

आता तर इथल्या कोरोना रुग्णांना खाणंही दिलं जात नाही. त्यामुळे फक्त आजारच नव्हे तर उपासमारीनंही तिथल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची भयाण परिस्थिती समोर आली आहे.

Published by: Priya Lad
First published: November 3, 2020, 7:12 PM IST

ताज्या बातम्या