दुबई 03 नोव्हेंबर: कोरोनावर औषध शोधण्यासाठी (COVID-19 vaccine ) जगभर संशोधन करण्यात येत आहे. काही देशांनी लस तयार केलीय तर अनेक देशांमध्ये आता अंतिम टप्प्यात संशोधन सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका कंपनीने लस तयार केली आहे. या लशीबद्दल लोकांमध्ये भीती आणि गैरसमज असल्याने ती भीती घालवण्यासाठी UAEचे पंतप्रधान शेख मोहोम्मद बीन अल मखदूम यांनीच ही लस घेत सुरक्षेची खात्री दिली.
देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या लशीच्या वापराला आणीबाणीच्या परिस्थितीत परवानगी देण्यात आल्याचं शेख मोहम्मद यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम कसं राहिल याची आम्ही काळजी घेत आहोत असंही ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून UAEमध्ये ही लस देण्यात येत आहे.
आपल्या मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांनीही ही लस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. UAEमधल्या अधिकारी आणि डॉक्टरांनी या लशीसाठी अतिशय मेहनत घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं.
या आधी रशियाने सगळ्यात पहिल्यांदा कोविडवर लस शोधून काढली होती. त्यानंतर दुसरी लस शोधल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र जागतिक पातळीवर त्याला फारशी मान्यता मिळाली नाही.
राज्याचं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच गेलं 90 टक्यांच्या वर
ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरची लस आता चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात असून सर्व जगभर त्या लशीच्या अंतिम चाचण्यांकडे मोठ्या आशेने पाहिलं जात आहे.
चीनच्या 4 लशी सध्या तिसऱ्या टप्प्यात
चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनावर आता चीननं 4 लशी तयार केल्याची माहिती मिळाली आहे. या तिन्ही लशी सध्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. Sinovac, inopharm, Sinopharm, CanSino Biological Inc.या चार लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहेत.
मॉडर्न आणि फाइजर यांनी तयार केलेली लस अंतिम टप्प्यात
अमेरिकेनं तयार केलेली ही लस सध्या अॅडव्हान्स आणि अंतिम टप्प्यात आहे. या लशीसाठी फंडिगही मिळत आहे.
रशियाची Sputnik V वॅक्सीनची ट्रालय
मॉस्कोमध्ये या लशीची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरू आहे. पण इतर देश अद्यापही या लशीच्या सुरक्षेच्या बाबात चिंतेत असल्यानं इतर देशांनी याचं ट्रायल सुरू केलं नाही.
Novavax लस शेवटच्या टप्प्यात
अमेरिकेच्या कंपनीने तयार केलेली Novavax ही लस सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. याशिवाय जॉन्सन अॅण्ड जॉन्सनही आता वृद्धांनंतर युवकांवर लशीची चाचणी करत आहे.
दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोनाची लस भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोरोनाच्या लशीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही लस साधारण 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत येईल असंही सांगण्यात आलं आहे.