जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नाआधी तुमच्या पार्टनरसह करा या 4 मेडिकल टेस्ट, नाहीतर लग्नानंतर येऊ शकतील समस्या

लग्नाआधी तुमच्या पार्टनरसह करा या 4 मेडिकल टेस्ट, नाहीतर लग्नानंतर येऊ शकतील समस्या

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

खरं तर लग्न टिकून राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुला-मुलीची जोडी परस्परपूरक असणं आवश्यक आहे. याकरता लग्नापूर्वी (Before Wedding) वधू-वरांनी काही मेडिकल टेस्ट्स (Medical Tests) करणं महत्त्वाचं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 09 फेब्रुवारी: भारतीय संस्कृतीत (Indian culture) लग्नसंस्काराला (Marriage) विशेष महत्त्व आहे. लग्न जमवताना मुला-मुलीची पत्रिका (Kundali) जुळणं आवश्यक असतं. आजच्या काळातदेखील अनेक जण पत्रिका जुळल्याशिवाय लग्न करण्यास मान्यता देत नाहीत; मात्र खरं तर लग्न टिकून राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुला-मुलीची जोडी परस्परपूरक असणं आवश्यक आहे. याकरता लग्नापूर्वी (Before Wedding) वधू-वरांनी काही मेडिकल टेस्ट्स (Medical Tests) करणं महत्त्वाचं आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. भारतात विवाहाचे अनेक रीतिरिवाज असतात. अनेक जण मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळल्यानंतरच लग्न ठरवतात. याशिवाय लग्न ठरवताना मुला-मुलीची वागणूक, अनुकूलता इत्यादी अनेक गोष्टी पाहिल्या जातात; पण एक गोष्ट आहे, ज्याकडे सहसा कोणी लक्ष देत नाही, ती गोष्ट म्हणजे मेडिकल फिटनेस. लग्नाआधी काही मेडिकल टेस्ट्स (Medical Tests Before Wedding) करून घेतल्यास जोडप्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं. लग्नाआधी प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचं मेडिकल स्टेटस जाणून घेणं आणि आपल्या मेडिकल स्टेटसची माहिती जोडीदाराला देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे नव्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही किंवा जोडीदाराला नेमका कसला त्रास आहे, याची कल्पना आधीच येऊ शकेल. हे वाचा- सतत तक्रारी करणाऱ्या लोकांपासून का राहावं दूर? डोक्याचं टेंशन घालवणारं संशोधन - रक्त गट चाचणी (Blood Group Compatibility Test) फार महत्त्वाची वाटत नसली, तरी ही चाचणी करून घ्यावी. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा रक्तगटाचा आरएच घटक (RH Factor) जुळणारा असणं महत्त्वाचं आहे. दोघांचे रक्तगट एकमेकांना अनुकूल नसतील, तर पत्नीला गर्भधारणेदरम्यान खूप त्रास सहन करावा लागू शकतो. - एसटीडी चाचणी ( Sexually Transmitted Diseases Test) लग्नानंतर लैंगिक रोगांची आणि लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या रोगांची लागण होऊ नये, यासाठी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या काळात लग्नापूर्वी सेक्स ही काही फारशी नवलाची गोष्ट राहिलेली नाही. अशा परिस्थितीत, लैंगिक रोगांची लागण होऊ नये, यासाठी ही चाचणी करून घेणं महत्त्वाचं आहे. या आजारांमध्ये एचआयव्ही, एड्स, गोनोरिया, नागीण, हिपॅटायटिस सी यांचा समावेश होतो. हे काही आजार आहेत, जे असुरक्षित सेक्स संबंधातून पसरतात. यापैकी बहुतेक रोग प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे ही चाचणी करून घेतल्यास अनेक अडचणी टाळता येतील. - आनुवंशिकता चाचणीदेखील (Genetic Test) लग्नापूर्वी जोडप्यांनी करून घेतली पाहिजे. आनुवंशिक रोग सहजपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात. अशा परिस्थितीत लग्नापूर्वी आनुवंशिकता चाचणी करून घेणं आवश्यक आहे. आनुवंशिक आजारांमध्ये स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, किडनीचे आजार आणि मधुमेह यांचा समावेश होतो. हे आजार लवकर आढळून आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतात, जेणेकरून पुढे कोणतीही समस्या उद्भवणार नाही. हे वाचा- तुम्ही बाळासाठी ही Baby powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका - वंध्यत्व चाचणी (Infertility Test) लग्नापूर्वी पुरुषांनी शुक्राणूंची (Sperm) स्थिती आणि संख्या जाणून घेण्यासाठी, तर स्त्रियांनी अंडाशयाचं आरोग्य जाणून घेण्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वंध्यत्वाशी संबंधित कोणतीही लक्षणं शरीरात आधीपासूनच दिसत नाहीत. ही माहिती केवळ चाचणीद्वारे प्राप्त होते. तुनॉर्मल सेक्स लाइफसाठी ही चाचणी खूप महत्त्वाची आहे. लग्नापूर्वी वधू-वरांनी करण्याच्या टेस्ट्सबद्दल आजही मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. लग्नानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी वधू-वरांनी किमान या चार वैद्यकीय चाचण्या करून घेणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: medical
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात