• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • नोकरी सोडून जोडप्यानं विकत घेतली नाव, सुरु आहे जगाची भ्रमंती

नोकरी सोडून जोडप्यानं विकत घेतली नाव, सुरु आहे जगाची भ्रमंती

एका जोडप्यानं नोकरी सोडून एक (Couple leaves job and buy a boat to roam the world) नाव विकत घेतली आणि जगाची भ्रमंती करायला सुरुवात केली.

 • Share this:
  एका जोडप्यानं नोकरी सोडून एक (Couple leaves job and buy a boat to roam the world) नाव विकत घेतली आणि जगाची भ्रमंती करायला सुरुवात केली. प्रवास करणं हा अनेकांच्या आवडीचा भाग असतो. काहीजण हे दैनंदिन कटकटीतून शांतता (Various reasons behind travel) आणि बदल मिळवण्यासाठी प्रवास करतात, तर काहींना जगातील उत्तमोत्तम ठिकाणं पाहायची असतात. कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, मात्र प्रवास करणं हा अनेकांच्या आवडीचा भाग असतो. असंच एक जोडपं सध्या जगाच्या (Couple on world tour) प्रवासाला निघालं आहे. जग फिरण्याचा निर्धार आपल्या नित्यनेमाच्या नोकरीला आणि त्याच त्याच नोकरीधंद्याला वैतागलेल्या टॅरिन पिकर्ड आणि तिचा पार्टनर लोगन या दोघांचंही स्वप्न हे जग फिरण्याचं होतं. मात्र आपापल्या नोकरीत अडकल्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नव्हतं. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडून जग फिरण्याचा निर्णय घेतला. जगातील वेगवेगळ्या प्रदेशांत जावं आणि एक प्रकारे थ्रिलिंग आयुष्य जगावं, असं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठीचं नियोजन सुरू केलं. या प्रवासात त्यांचा पाळीव कुत्रादेखील सोबत आहे. विकत घेतली नाव जगाचा प्रवास पाण्यातून करावा, अशी कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी त्यावर काम सुरू केलं. सुरुवातीला नाव तयार करणं, त्याचा मेंटेनन्स करणं आणि इतर प्राथमिक गोष्टी माहिती करून घेण्यासाठी त्यांनी एक क्रॅश कोर्स केला. त्यानंतर 20 लाख रुपये खर्च करून त्यांनी एक नाव खरेदी केली. मात्र ही नाव त्यांना छोटी वाटू लागली आणि आपल्या गरजांसाठी थोडी मोठी नाव असणं गरजेचं आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी पहिली नाव विकून 48 लाख रुपयांची नवी नाव विकत घेतली. या नावेवर त्यांनी जवळपास 1 वर्ष काम केलं. मात्र त्यानंतर ही नाव खराब वातावरणात नीट चालत नसल्याचा अनुभव त्यांना आला. त्यानंतर ती नावदेखील विकली आणि 40 फूट लांब स्टील लेस बोट त्यांनी विकत घेतली आणि त्यासाठी 74 लाख रुपये मोजले. हे वाचा - मुलाला घाबरवण्यासाठी वडील बनले राक्षस, अवस्था पाहून आवरेना हसू; पाहा VIDEO सध्या हे कपल खूश असून बोटीतून प्रवासाचा आनंद घेत आहे. बोटीत 600 लिटर पाण्याची टाकी आहे. हे पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी वापरलं जातं. इतर सगळ्या कामांसाठी ते समुद्राचं पाणी वापरतात आणि किराणा सामान भरण्यासाठी महिन्यातून एकदा किनाऱ्यावर येतात.
  Published by:desk news
  First published: