लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) मंजुरी दिली आहे.
2/ 10
COVISELF असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट (My Lab Discovery solution Ltd.) तयार केली आहे.
3/ 10
फक्त 250 रुपयांत मेडिकल शॉपवर ही टेस्ट किट उपलब्ध होईल. हे टेस्ट किट कसं वापरावं याबाबत आयसीएमआरने सूचना जारी केल्या आहेत.
4/ 10
केमिस्ट शॉपमधूनच COVISELF टेस्ट कीट विकत घ्या, असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.
5/ 10
COVISELF मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि त्यावर नोंदणी करा.
6/ 10
टेस्ट कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती युझर मॅन्युअलमध्ये नीट वाचा.
7/ 10
COVISELF किटमधील स्टिक वापरून नाकातील स्वॅब घ्यायचे आहेत. ते या किटमधील एका छोट्याशा बाटलीत ठेवायचं आहे.
8/ 10
त्यानंतर प्रेग्नन्सी किटमधील स्ट्रिपप्रमाणे एक स्ट्रिप देण्यात आली आहे, त्यावर या स्वॅबचे नमुने टाकावेत.
9/ 10
ज्या मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे, त्याच मोबाईलवर टेस्ट स्ट्रिपचा फोटा काढायचा. हा डेटा थेट आयसीएमआरच्या टेस्टिंग पोर्टल स्टोअरवर जाईल. रुग्णाच्या गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल.
10/ 10
मोबाईल अॅपमार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचा रिपोर्ट मिळेल.