मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल

Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

म्युकॉर्मायकॉसिस नावाच्या एका बुरशीजन्य संसर्गाने भीती पसरवली आहे.

Centre revises corona guidelines : केंद्र सरकारने कोरोना नियमांमध्ये बदल केले आहेत.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 26 मे : कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आणि कोरोनाचे नवीन स्ट्रेन्स, कोरोना पसरण्याचा मार्ग त्यानुसार केंद्र सरकारने कोरोना नियम आणि उपचारात काही बदलही करत आहे. केंद्र सरकारने नवे प्रोटोकॉल (Covid protocol) जारी केले आहेत. कोरोना हा हवेतून पसरतो (Corona spread through air) आहे. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा बाहेर पडणाऱ्या थेंबावाटेही कोरोना पसरतो (Covid airborne spreads), असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार सरकारने कोरोना गाइडलाइन्समध्ये (Corona revised guidelines) काही बदल केले आहेत

याआधी कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास कोरोना पसरत असल्याचं सांगण्यात आलं होतं. जेव्हा कोरोना संक्रमित ड्रॉपलेट्स एखाद्या पृष्ठभागावर पडतात तेव्हा तिथं एका विशिष्ट कालावधीपर्यंत व्हायरस टिकून राहतो. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर निरोगी व्यक्तीने जर तसे हात आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला लावले तर त्यामुळे ती व्यक्तीही कोरोना संक्रमित होते. असं याआधीच्या प्रोटोकॉलमध्ये सरकारने सांगितलं होतं.

हे वाचा - New Coronavirus: याठिकाणी सापडला नवा कोरोना विषाणू, श्वानांमधून झालं संक्रमण

पण आता कोरोना हा हवेतूनही पसरतो असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोरोनाचे नियम आणि उपचारासासंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Covid-19 clinical management guidelines). गेल्यावर्षी जारी केलेल्या कोरोना प्रोटोकॉलमध्ये काही बदल केले आहेत.

नव्या गाइडलाइन्सनुसार सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार यांनी कोरोना हा हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि योग्य व्हेंटिलेशन ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

संक्रमित व्यक्तीपासून ड्रॉपलेट 2 मीटरपर्यंत तर एरोसोल्स 10 मीटरपर्यंत जातात. याआधी कमीत कमी 6 फूट म्हणजे 1.8 मीटर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हे वाचा - कोरोनानंतर 5 जिल्ह्यांमध्ये नव्या आजाराचं थैमान; पाहा यात तुमचा जिल्हा नाही ना?

हवेतून कोरोनाव्हायरसचं प्रमाण कमी करण्यात आणि संक्रमित व्यक्तीमार्फत इतरांपर्यंत संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यात व्हेंटिलेशन असलेली जागा महत्त्वाची भूमिका बजावते. ड्रॉपलेट आणि एरोसोलच्या रूपात लाळ आणि नाकातील स्राव एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. मोठे थेंब पृष्ठभागावर पडतात आणि छोटे थेंब हवेत काही अंतरापर्यंत जातात. बंदिस्त खोलीत जिथं योग्य व्हेंटिलेशन नाही तिथं ड्रॉपलेट आणि एरोसोलमार्फत कोरोना संसर्गाचा धोका खूप असतो.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19