कामात खाणं-पिणं, आराम विसरलात; तुम्ही 'या' समस्येचे शिकार तर नाही झालात ना?

कामात खाणं-पिणं, आराम विसरलात; तुम्ही 'या' समस्येचे शिकार तर नाही झालात ना?

ऑफिसच्या कामापुढे तुम्हाला दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाही का?

  • Share this:

मुंबई, 07 जून : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाऊन (lockdown) लागू झाला आणि त्यानंतर कित्येक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करू लागले. अशा वेळी कामाचा दर्जा सुधारू, स्वत:ला, कुटुंबाला, मित्रांना वेळ देऊ, दैनंदिन कामं वेळत उरकू आणि उरलेल्या वेळेचा सदुपयोग छंद, आवडीनिवडी जोपाण्यासाठी करू. असा प्लॅन प्रत्येकाने केला. मात्र आता परिस्थिती वेगळीच आहे.

दिवसाची सुरुवात आणि शेवटही होतो तो ऑफिसच्या कामाने. कुटुंब, मित्रांना सोडा स्वत:चं भानही राहत नाही. कामात स्वत:ला इतकं झोकून दिलं जातं, ज्यामुळे आराम तर लांबची गोष्ट खाणं-पिणंही विसरत आहात. जास्त काम करण्याच्या नादात शिफ्ट संपल्यानंतरही काम करत आहात. याला टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटी (Toxic Productivity) म्हणतात.

टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटीची लक्षणं

स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न देणं

मित्र आणि कुटुंबाशी न बोलणे

नीट खाणं-पिणं होत नाही

झोप लागत नाही

इतर जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाहीत

हे वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी मदत करणार मिठाई; तु्म्ही खाल्लीत की नाही?

अनेक लोकं आपली वॅल्यु आपल्या प्रोडक्टिव्हिटीसह जोडून पाहतात की त्यांनी दिवसातील किती तास काम केलं आहे आणि हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कामातून ब्रेक घेताना, काम मध्येच थांबवून स्वयंपाक करताना किंवा जेवताना तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रोफेशनल वॅल्यु कमी होते आहे, तर तुम्ही टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटीचे शिकार होऊ शकता.

द क्विंटमधील रिपोर्टनुसार, टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटी ही काम करण्याची अशी भूक आहे जी कधीच शांत होत नाही. तुम्ही जितकं जास्त काम कराल, तितकं जास्त प्रोडक्टिव्ह राहाल त्यामुळे तुमचं कौतुकही तितकंच होईल, कामाचा फळ मिळेल ज्यामुळे तुमचं मनोबलही वाढेल. मात्र यामध्ये आपण या सर्वालादेखील एक मर्यादा असते, हे विसरतो.

टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटीपासून स्वत:ची सुटका कशी कराल?

गरजेपेक्षा जास्त काम करू नका.

वीक ऑफच्याच दिवशी आराम करायचा हा विचार सोडून द्या. कामाच्या मध्येही तुम्ही ब्रेक घेऊ शकता

मेडिटेशन करा, घराजवळील किंवा गॅलरीत झाडांसोबत थोडा वेळ घालवा, जेणेकरून मनाला शांती मिळेल.

हे वाचा - कोरोनाचा धोका; रुग्णालयात जाण्यापूर्वी नागरिकांनी काय घ्यावी काळजी?

First published: June 7, 2020, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading