अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी वाढवणार ही मिठाई; तु्म्ही खाल्लीत की नाही?

अरे व्वा! कोरोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी वाढवणार ही मिठाई; तु्म्ही खाल्लीत की नाही?

11 हर्ब्सपासून ही मिठाई (11 herbs sweet) तयार करण्यात आली आहे.

  • Share this:

कोलकाता, 07 जून : कोरोनाव्हायरसविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. यासाठी कोरोना रुग्णांनाही तसा आहार आणि औषधं दिली जात आहे. शिवाय सर्व नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा आहार घेण्याचा सल्ला दिला जातो आहे. अशातच पश्चिम बंगालमध्ये  (West begnal) मिठाई विक्रेत्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल अशी मिठाई (sweet) तयार केली आहे.

कोलकात्यातील (Kolkata) एका दुकानात अशी संदेश (sandesh) मिठाई तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. 11 हर्ब्सपासून (Herbs) ही मिठाई तयार करण्यात आली आहे.

संदेश मिठाई मिष्टी दही, रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध अशी बंगाली मिठाई आहे. ही मिठाई पनीर, ड्रायफ्रुट्स आणि साखरेसह तयार केली जाते. मात्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या मिठाईत तुळस, हळद, छोटी वेलची, जायफळ, आलं, काळी मिरी, जिरं, तमालपत्र असे अकरा हर्ब्स वापरण्यात आले. शिवाय यात साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तर मधाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून मिठाईत वापरलेल्या हर्ब्समधीलपोषक घटक कायम राहतील.

हे वाचा - गूड न्यूज! कोरोनाव्हायरसविरोधात औषध सापडलं; भारतातील शास्त्रज्ञांचा दावा

ही मिठाई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे शरीर कोरोनाव्हायरसविरोधात लढण्यासाठी सक्षम होईल, असा दावा ही मिठाई तयार करणाऱ्या मिठाई विक्रेत्याने केला आहे.

इम्युनिटी संदेश तयार करणाऱ्या मिठाईच्या दुकानाचे प्रमुख सुदीप मल्लिक यांनी सांगितलं, "भारतात या औषधांचा उपयोग मसाले म्हणून केला जातो. हे हर्ब्स आजारांशी लढण्याची क्षमता देतात. त्यामुळे त्यांनी या वनऔषधींचा वापर करून मिठाई तयार केली आहे. या वनऔषधींमुळे कोरोनाव्हायरशी लढण्यास मदत मिळू शकेल असं मला वाटतं"

हे वाचा - अहो कोरोनाव्हायरसला सोडा; तुम्ही हा 'कोरोना स्पेशल खाखरा' खाल्लात की नाही?

First published: June 7, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या