कोरोनाव्यतिरिक्त इतर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही उपचारासाठी धावाधाव करत आहे. काही खासगी हॉस्पिटल्समध्ये ओपीडीला सुरुवात झाली असून कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर, दुखण्यांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी.
2/ 10
इतर आजाराच्या रुग्णांनी किंवा इतर नागरिकांनी रुग्णालयात जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे इंटरनल मेडिसीन एक्सपर्ट डॉ. तुषार राणे यांनी मार्गदर्शन केलं आहे.
3/ 10
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर शरीराच्या तापमानाची तपासणी, सॅनिटायझिंग असे कोरोनासंबंधी मूल्यांकन पूर्ण करूनच रुग्णालयात प्रवेश करावा.
4/ 10
रुग्णालयात पैसे भरण्यासाठी शक्यतो डिजीटल पर्यायांचा वापर करा.
5/ 10
तपासणीसाठी दिलेल्या वेळेचं पालन करा, त्या वेळेतच रुग्णालयात हजर राहा.
6/ 10
रुग्ण स्वत: रुग्णालयात जाण्यास सक्षम असतील तर शक्यतो त्यांनीच रुग्णालयात जावं. गरज असेल तरच सोबत एखाद्या व्यक्तीला न्यावं.
7/ 10
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.
8/ 10
सार्वजनिक शौचालयांचा वापर करू नका.
9/ 10
रुग्णालयातील वस्तूंना स्पर्श करणं टाळा.
10/ 10
तपासणीनंतर तुमचे रिपोर्ट्स ऑनलाईन मिळतील का याची विचारणा करा.