Home /News /lifestyle /

Coronavirus चा महाभयानक चेहरा, परिस्थितीनुसार बदलतो रूप

Coronavirus चा महाभयानक चेहरा, परिस्थितीनुसार बदलतो रूप

त्यामुळेच कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) उपचार शोधण्यात वेळ लागत असल्याचं म्हटलं जातं आहे.

    मुंबई, 28 मार्च : जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना विळखा घातला आहे, 14 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस इतका महाभयानक आहे, की तो परिस्थितीनुसार रूप बदलतो आहे. कोरोनाव्हायरसचं स्वत:चं अस्तित्व नाही. त्याचं स्वत:चं सेल स्ट्रक्चर नाही. त्याचं स्वत:चं सेल स्ट्रक्चर नाही. मानवी शरीरातील प्रोटिननुसारवरच त्याचं पोषण होतं. त्यामुळे त्या व्यक्तीची कमजोरी व्हायरसची कमजोरी होते.मानवी शरीरातील प्रोटिननुसारवरच त्याचं पोषण होतं. त्यामुळे त्या व्यक्तीची कमजोरी व्हायरसची कमजोरी होते आणि त्यामुळेच या व्हायरसविरोधात उपचार शोधण्यात वेळ लागत असल्याचं म्हटलं जातं आहे. हे वाचा - फक्त 20 सेकंद हात धुतल्याने जीवघेण्या Coronavirus चा नाश कसा होतो? अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील व्हायरोलॉजिस्ट कार्ला किर्कगार्ज यांच्या मते,  अशा परिस्थितीत कोरोनाव्हायरसचा नाश करणारी औषधं आपल्यालाही नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे कोरोनाव्हायरसवरील औषध तयार करणं एक मोठं आव्हान आहे. डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाव्हायरसने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर इतर देशांमध्ये त्याच्यावरील उपचारांचा शोध सुरू झाला. हे वाचा - आता घरच्या घरी कळतील कोरोनाची लक्षणं, रिलायन्सने आणले MyJio Coronavirus Tool या व्हायरसचा नाश करण्यासाठी 2 मार्गांनी प्रयत्न सुरू आहेत. एकिकडे शास्त्रज्ञ या व्हायरसवरील उपचारासह व्हायरसविरोधातील लस विकसित करत आहेत, तर दुसरीकडे मलेरियासारख्या इतर औषधांचा वापर करून उपचार केले जात आहे, त्यांचा या व्हायरवर किती परिणाम होतो हे तपासलं जात आहे. अद्यापही व्हायरसविरोधात ठोस असा उपचार सापडलेला नाही. काही देशांमध्ये लसी विकसित झाल्यात त्यांची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सांगितल्यानुसार यशस्वी चाचणी होऊन या लसीला परवानगी मिळेपर्यंत किमान दीड वर्षांचा कालावधी तरी जाईल. याचा अर्थ या वर्षी तरी या व्हायरसवरची लस मिळण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे आपण काळजी घेणं हाच एक मार्ग आहे. हे वाचा - 'एकदम खरं! कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या