Home /News /lifestyle /

फक्त 20 सेकंद हात धुतल्याने जीवघेण्या Coronavirus चा नाश कसा होतो?

फक्त 20 सेकंद हात धुतल्याने जीवघेण्या Coronavirus चा नाश कसा होतो?

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्यासाठी साबण (soap) आणि पाण्याने (water) हात स्वच्छ धुवावेत (hand washing) असा सल्ला दिला जातो आहे.

    मुंबई, 24 मार्च : कोरोनाव्हायरचा (Coronavirus) नाश करेल असं औषध आणि त्यापासून बचाव करणारी लस विकसित करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येकाने कोरोनाव्हायरसला दूर ठेवण्यासाठी साबण (soap) आणि पाण्याने (water) हात स्वच्छ धुवावेत (hand washing) असा सल्ला दिला जातो आहे. कमीत कमी 20 सेकंद हात धुवावेत असं सांगितलं जातं. मात्र फक्त हात धुतल्याने जीवघेण्या कोरोनाव्हायरसचा नाश कसा काय होतो? याबाबत सीएनएनने (CNN) काही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचं वृत्त दिलं आहे. हे वाचा - 'फक्त डिफेंड नाही, अटॅक करा', या खेळाच्या रणनीतीप्रमाणे कोरोनाशी लढा - WHO युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिक सेंटर चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील (University of Pittsburgh Medical Center Children's Hospital) व्हायरोलॉजिस्ट डॉ. जॉन विल्यम्स यांनी सांगितल्यानुसार, कोरोनाव्हायरचा बाह्यभाग हा लिपिड म्हणजे फॅटसारख्या पदार्थांपासून बनलेला आहे. एखाद्या डिशवलरील बटर तुम्ही फक्त पाण्याने काढण्याचा प्रयत्न केला, तर तो निघत नाही तुम्हाला बटरचा हा तेलकटपणा घालवण्यासाठी साबणाची गरज असतं. अगदी तसंच व्हायरसभोवती असलेल्या लिपिडविरोधात साबण किंवा अल्कोहोल काम करतं.  व्हायरसच्या बाहेरील हे आवरण निघालं की व्हायरस निष्क्रिय होतो, ते मानवी शरीरातील पेशीत प्रवेश करू शकत नाही" हे वाचा - तुम्हीही होऊ शकता Coronavirus चे शिकार, असा करा स्वत:चा बचाव फक्त साबण आणि कोमट पाण्यात व्हायरसचा नाश करेल इतकी क्षमता असते? नॅशव्हिलेतील व्हँडरबिल्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे (Vanderbilt University School of Medicine in Nashville) डॉ. विल्यम शॅफ्नर यांनी सांगितल, जेव्हा आपण हात धुतो, तेव्हा  तुम्ही हात धुता तेव्हा हातांवरील जंतूंना हानी पोहोचते, साबणाच्या फेसात ते अडकतात किंवा त्यांचा नाशही होतो आणि जेव्हा हात पाण्याने धुतले जातात तेव्हा हे जंतू त्या पाण्याच्या प्रवाहात हातावरून निघून जातात. हे वाचा - Coronavirus पासून वाचण्यासाठी वारंवार हँड सॅनिटायझर वापरताय, इतर आजारांना आमंत्रण देताय अनेक जण म्हणतात की कोमट पाण्याने हात धुवायला हवेत, मात्र खरंच याची गरज आहे का याबाबत बोलताना एमोरी युनिव्हर्सिटीतील (Emory University) बिल वुएस्ट म्हणाले, "कोमट पाण्यानेच व्हायरस मरतात असं नाही. त्यासाठी पाण्याचं एक विशिष्ट तापमान लागतं, जे त्वचेसाठी असह्य असतं. त्यामुळे साबणाने हात धुताना कोमट पाणीच हवं असं नाही, कोमट पाण्याने साबणाचा फेस चांगला येतो आणि साबणाचा चांगला फेस येणं हे हातावरील धूळ आणि जंतू निघून जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हात धुताना थंड पाणीही वापरू शकता फक्त साबणाचा हा फेस येईल याची काळजी घ्यावी. तोपर्यंत हात स्वच्छ करत राहावेत"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या