जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सर्वसामान्यांसाठी बाजारात कधी उपलब्ध होणार कोरोना लस? केंद्रानं जाहीर केला तो दिवस

सर्वसामान्यांसाठी बाजारात कधी उपलब्ध होणार कोरोना लस? केंद्रानं जाहीर केला तो दिवस

सर्वसामान्यांसाठी बाजारात कधी उपलब्ध होणार कोरोना लस? केंद्रानं जाहीर केला तो दिवस

सध्या सरकारमार्फत मोजक्याच लोकांना कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे, पण सर्वांसाठी ही लस कधी उपलब्ध होणार, याबाबत एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : भारतात सध्या कोरोना लसीकरण (corona vaccination) मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस (corona vaccine) दिली जाते आहे. सरकारनं यासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. सरकारच्या यादीत फक्त आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्यांचा समावेश आहे. ही लस (covid 19 vaccine) फक्त सरकारच देतं आहे, म्हणजे तुम्हाला जर हा वैयक्तिकरित्या ही लस घ्यायची असेल तर ती तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध नाही. मात्र आता लवकरच ही लस सर्वांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांसाठी बाजारात कोरोना लस कधी मिळणार याचं उत्तर दिलं आहे, नवी दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी. या वर्षातच सर्वांसाठी कोरोना लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “प्राधान्यानं ज्यांना लस दिली जाते आहे, त्यांचं लसीकरण झाल्यानंतर आणि लशीच्या मागणीइतकाच पुरवठा होत असेल तेव्हा कोरोना लस बाजारात उलब्ध करून दिली जाईल. कदाचित याच वर्षाच्या अखेरला किंवा त्याआधीच हे शक्य होईल अशी आशा आहे” हे वाचा -  मुंबई-पुण्यातील ‘या’ ठिकाणी जाणं टाळा; आता इथं आहे कोरोनाचा सर्वात जास्त धोका भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) ही स्वदेशी कोरोना लस आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (serum institute of india) ऑक्सफोर्ड (Oxford) अॅस्ट्राझेनेकाची (AstraZenecas) कोविशिल्ड (Covishield) या दोन लशी लसीकरण मोहिमेत दिल्या जात आहे. जूनपर्यंत 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटी 50 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं आहे. सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनादेखील लस दिली जाण्याची शक्यता आहे. 4 आठवड्यांच्या अंतरानंतर आता लशीचा पहिला डोस घेतलेल्यांना लशीचा दुसरा डोसही दिला जातो आहे. हे वाचा - पुण्यात नवे CORONA HOTSPOTS; पुणेकरांनो सांभाळा नाहीतर… केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात 87,40,000 लोकांना लस देण्यात आली आहे. यापैकी 85,70,000 जणांना लशीचा पहिला डोस तर  1,70,000 जणांना लशीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात