Home /News /lifestyle /

मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी?

मासिक पाळीत कोरोना लस घेताना काय काळजी घ्यावी?

मासिक पाळीत कोरोना लस घेणं पूर्णपणे सुरक्षित आहे, पण काही काळजी घेणंही गरजेचं आहे.

    मुंबई, 17 जून : 18 + व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. सध्या 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना जे सरकारी लसीकरणात कोरोना लस घेत आहेत, त्यांनाच मोफत लस दिली जाते आहे. पण 21 जूनपासून सरकारी केंद्रात लस घेणाऱ्या सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक जण कोरोना लस घेतील. पण तरी कोरोना लशीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेच. विशेषतः महिलांच्या मनात कोरोना लशीबाबत अनेक प्रश्न आहे, कारण त्यांना वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आरोग्याच्या काही समस्यांचा सामना करावा लागतो. मग यामध्ये  मासिक पाळी (Menstrual period and corona vaccination), प्रेग्नन्सी (Pregnancy and corona vaccination), ब्रेस्टफिडिंग (Brastfeeding and coroana vaccination), रजोनिवृत्ती (Menopause and corona vaccination) अशा टप्प्प्यांचा समावेश आहे. कुणी कोरोना लस घ्यावी आणि कुणी नाही, याबाबत सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट फिरतात. विशेषतः मासिक पाळीत कोरोना लस घेऊ नये, असं काही दिवसांपूर्वी सांगितलं जात होतं. याबाबत न्यूज 18 लोकमतने वोक्हार्ट रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी याबात सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. हे वाचा - फक्त एक भारतीय औषध, सर्व व्हेरिएंट्सचं काम तमाम; कोरोनाविरोधी लढ्यात मोठं हत्यार मासिक पाळी आणि कोरोना लस मासिक पाळीत हार्मोनल बदल होत असतात. शरीराची इम्युनिटी वर्षानुवर्षे तयार होत असते. ती एका दिवसात तयार होत नाही किंवा एका दिवसात कमी होत नाही. आम्ही मासिक पाळीत जीम, एक्सरसाइझ करायला सांगतो. मासिक पाळीत महिला शारीरिक कष्टाची कामंही करतात. त्यामुळे मासिक पाळीत लस घ्यायला काहीच हरकत नाही. मासिक पाळीत कोरोना लशीचे दुष्परिणाम लशीचे थोडे दुष्परिणाम होतात. पाय दुखणे, सौम्य ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे, अंगदुखी, पोटऱ्या दुखणे अशा समस्या लस घेतल्यानंतर उद्भवू शकता. मासिक पाळीतच नाही तर लस घेतलेल्या कुणालाही या समस्या जाणवतील. त्यामुळे अशावेळी लस घेतल्यानंतर घरी आराम करा, पॅरासिटामॉल घ्या आणि खूप पाणी प्या. शरीर हायड्रेट राहणं गरजेचं आहे. हे वाचा - कोरोनापासून लेकाला वाचवण्यासाठी पालकांनी उचललं असं पाऊल; PM मोदीही झाले भावुक मासिक पाळीत लस घेताना घ्यायची काळजी मासिक पाळीत रक्तदाब कमी होऊ शकतो. अशा वेळी इलेक्ट्रल पावडर, एनर्जी, लिंबू पाणी किंवा साधं पाणी प्यावं त्यामुळे बीपी कमी होणार नाही, गरगरणार नाही. शिवाय लस घ्यायला जाताना काहीतरी खाऊन जावं, उपाशी पोटी जाऊ नये.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Periods, Woman

    पुढील बातम्या