मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनापासून चिमुकल्या लेकाला वाचवण्यासाठी पालकांनी उचललं असं पाऊल; पंतप्रधान मोदीही झाले भावुक, म्हणाले...

कोरोनापासून चिमुकल्या लेकाला वाचवण्यासाठी पालकांनी उचललं असं पाऊल; पंतप्रधान मोदीही झाले भावुक, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा वर्षांच्या मुलाच्या आई-वडीलांच्या धैर्याचं आणि सकारात्मक विचाराचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा वर्षांच्या मुलाच्या आई-वडीलांच्या धैर्याचं आणि सकारात्मक विचाराचं कौतुक केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा वर्षांच्या मुलाच्या आई-वडीलांच्या धैर्याचं आणि सकारात्मक विचाराचं कौतुक केलं आहे.

  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 16 जून : कोरोनापासून (Coronavirus) आपला बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो आहे. कोरोनाच्या विळख्यात आता लहान मुलंही सापडत असल्याने पालक आपल्या मुलांना कोरोनापासून वाचवण्याचा (Parent Protect child from corona) पुरेपूर प्रयत्न आहेत. कोरोनाला आपल्या मुलांपासून दूर ठेवण्यासाठी धडपडत आहेत. पण जर पालकांनाच कोरोना झाला, तर मग मुलांना कोरोनापासून कोण वाचवणार? शिवाय त्या मुलाची काळजी कोण घेणार? अशी चिंता पालकांना लागून राहते. अशाच कोरोना पॉझिटिव्ह पालकांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाच्या मुलाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी असं पाऊल उचललं (Parent Protect 6 Year Old Son from corona), ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) भावुक झाले.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये (ghaziabad) राहणारी पूजा वर्मा आणि गगन कौशिक यांना कोरोनाची लागण झाली, तेव्हा त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला कोरोनापासून वाचवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा वर्षांच्या मुलाच्या आई-वडीलांच्या धैर्याचं आणि सकारात्मक विचाराचं कौतुक केलं आहे.

पूजा, गगन आपल्या सहा वर्षांच्या मुलासोबत एका तीन खोली असलेल्या फ्लॅटमध्ये राहतात. एप्रिलमध्ये पूजा आणि गगन दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मुलाला मात्र कोरोना नव्हता. आपल्यामुळे मुलाला कोरोना होऊ नये, आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवत मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुलाला आपल्यापासून दूर (Parent Self Isolating) ठेवलं. तिघंही तीन वेगवेगळ्या रूममध्ये राहू लागले.

हे वाचा - फक्त एक भारतीय औषध, सर्व व्हेरिएंट्सचं काम तमाम; कोरोनाविरोधी लढ्यात मोठं हत्यार

इतके दिवस आपल्या चिमुकल्या लेकापासून दूर राहणं म्हणजे कोणत्याही पालकांसाठी कठीण परीक्षाच असते.

पूजा म्हणाली, सहा वर्षांच्या मुलासाठी हे सोपं नव्हतं. कोरोनाव्हायरस काय आहे, त्यासंबंधी नियम काय आहे, आपण असं वेगळं का राहायला हवं, याबाबत त्याला काही समजत नव्हतं. त्याला फक्त आपल्या आईबाबांचं प्रेम हवं होतं. आपण काय चुकीचं केलं त्यामुळे आपले आई-बाबा आपल्यासोबत राहत नाहीत. दुसऱ्या रूममध्ये राहतात, त्यांनी आपल्याला असं वेगळं रूममध्ये ठेवलं, असाच प्रश्न त्याला पडला.

एक आई म्हणून पूजाने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. कवितेच्या माध्यमातून तिने आपली व्यथा मांडली. पंतप्रधान मोदींनाही या दाम्पत्याचं कौतुक वाटलं.

पंतप्रधान मोदींनीही कुटुंबाला पत्र लिहून त्यांच्याबाबत विचारणा केली, "अशा परिस्थितीतही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने कोरोनासंंबधी नियमांचं पालन केलं आणि आजाराशी लढा दिला याचा मला आनंद आहे. कठीण परिस्थितीतही संयम राखायला हवा, हिंमत ठेवायला हवी हे आपल्याला शास्त्रांनी शिकवलं आहे"

पूजा यांनी लिहिलेल्या कवितेचं कौतुक करत मोदी म्हणाले, "ही कविता त्या आईची चिंता व्यक्त करते, जी आपल्या बाळापासून दूर असते. हिंमत आणि सकारात्मक विचारामुळे वर्मा अशाच पुढे जातील आणि आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हांनाचा यशस्वीरित्या सामना करतील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

दरम्यान या दाम्पत्याने आपल्या मुलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना त्यांच्या या कठोर निर्णयाचं चांगलं फळ मिळालं. ते दोघंही कोरोनातून बरे झाले आणि त्यांनी मुलालाही कोरोनापासून वाचवं.  "आम्ही दोघंही कोरोनातून पूर्णपणे बरे झालो आहोत. आम्ही कोरोना नियमांचं कठोर पालन केल्याने आमचा मुलगा कोरोनाच्या विळख्यात आला नाही, असं गगन यांनी सांगितलं.

कोरोना नियमांचं पालन न करणारे, बेजबाबदारपणे वागणाऱ्या लोकांसाठी हे पालक म्हणजे एक आदर्श आहे.

First published:

Tags: Coronavirus, Parents and child, Pm narenda modi, Uttar pradesh