मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त 250 रुपयांत घरच्या घरी करा कोरोना टेस्ट; कुठे मिळतेय Corona self test kit पाहा

फक्त 250 रुपयांत घरच्या घरी करा कोरोना टेस्ट; कुठे मिळतेय Corona self test kit पाहा

 Corona self test kit : अवघ्या 15 मिनिटांत तुमचा कोरोना टेस्ट रिपोर्ट तुमच्या हातात असेल.

Corona self test kit : अवघ्या 15 मिनिटांत तुमचा कोरोना टेस्ट रिपोर्ट तुमच्या हातात असेल.

Corona self test kit : अवघ्या 15 मिनिटांत तुमचा कोरोना टेस्ट रिपोर्ट तुमच्या हातात असेल.

मुंबई, 03 जून : कोरोना टेस्ट (Corona test) करण्याच्या सध्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR TEST) आणि दुसरी म्हणजे रॅपिड अँटिजेन टेस्ट (Rapid antigen test). पण या दोन्ही टेस्ट तज्ज्ञांमार्फत किंवा प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केल्या जातात. पण आता तुम्हीसुद्धा स्वतःची कोरोना टेस्ट (Corona self test kit) करू शकता. तीसुद्धा घरच्या घरी फक्त 250 रुपयांत. तुमच्या जवळच्या मेडिकल श़ॉपमध्ये किंवा ऑनलाईनही तुम्हाला हे टेस्ट किट उपलब्ध होईल.

COVISELF (Pathocatch) असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट (My Lab Discovery solution Ltd.) तयार केली आहे.

लोकांना घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करता येईल अशा RAT टेस्टच्या किटला इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली होती.  या टेस्ट किटचं कर्मिशअल लाँचिंग झालं आहे. म्हणजे ही टेस्ट कीट आता बाजारात उपलब्ध होणार आहे. तुमच्या जवळच्या मेडिकल शॉपमध्ये किंवा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरसुद्धा ही टेस्ट किट तुम्हाला खरेदी करता येईल.

हे वाचा - धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह

या टेस्टमार्फत ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह मानलं जाईल आणि दुसरी कोणतीही टेस्ट करण्याची गरज नाही. असं आयसीएमआरने सांगितलं आहे. त्यांना होम आयसोलेशनच्या नियमांचं पालन करावं लागेल. तर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागेल. अशा रुग्णांना संशयित कोरोना रुग्ण मानलं जाईल आणि आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल.

हे वाचा - फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing पूर्वी वाचा ICMR ची Advisory

ही होम टेस्टिंग किट फक्त अशा लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी आहे, जे लॅब टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. अवघ्या 15 मिनिटांत तुमचा कोरोना टेस्ट रिपोर्ट तुमच्या हातात असेल.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Test