मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह

धक्कादायक! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस पोखरून काढलं, तरी टेस्ट निगेटिव्ह

8 वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलाचं फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं.

8 वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलाचं फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं.

8 वर्षांच्या कोरोना संक्रमित मुलाचं फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं.

  • Published by:  Priya Lad
संजय कुमार/पाटणा, 03 जून :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus second wave) कोरोना संक्रमित लहान (Coronavirus in child) मुलांचीही बरीच प्रकरणं समोर येत आहेत. शिवाय या मुलांमध्ये कोरोनातून बरं झाल्यानंतर MIS-C हा गंभीर सिंड्रोमही दिसून आहे. दरम्यान आता बिहारमध्ये एका कोरोना संक्रमित लहान (Bihar chidl corona case) मुलाचं असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. हे प्रकरण म्हणजे डॉक्टरांसाठी मोठं आव्हान आहे. पाटणाच्या IGIMS मध्ये एका 8 वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचं फुफ्फुस 90% फुफ्फुस खराब झालं आहे. किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं आहे. पण त्याची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली, अँटिजेन टेस्ट केली. पण दोन्ही टेस्टमध्ये कोरोनाचं निदान झालं नाही. दोन्ही टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.  सिटी स्कॅनमध्ये त्याच्या कोरोनाचं निदान झालं, सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून तर डॉक्टरांना धक्काच बसला. हे वाचा - फक्त 10 रुपयांत कोरोनावर उपचार; गरीबांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर कपलची धडपड आयजीआयएमएसचे अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितल, 22 मे रोजी या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला ताप, खोकला होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याची अवस्था पाहू त्याला तात्काळ आपात्कालीन परिस्थितीत दाखल करण्यात आलं. त्याच्या काही चााचण्या करण्यात आला. ज्यामध्येच त्याचं फुफ्फुस, किडनी आणि लिव्हरला गंभीर इन्फेक्शन झाल्याचं दिसलं. मुलाच्या जिवाला धोका होता. सिटी स्कॅनमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत होतं. या मुलाची अशी अवस्था पाहून डॉक्टरही चिंतेत पडले. कोरोनाची ही तिसरी लाट तर नाही ना, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली.  मुलावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. हे वाचा - कोरोना रिपोर्टचं कारण सांगून फिरवत राहिले; बापाच्या खांद्यावरच लेकीने सोडला जीव या मुलाला अँटिबायोटिक्स, रेमडेसिवीर आणि एस्टेरॉइजसह नेब्युलाइझेशन देण्यात आलं. दर मिनिटाला 16 लीटर ऑक्सिजन देण्यात आलं.  त्याच्या उपचारात डॉक्टरांची टीम दाखल होती.  अखेर सुदैवाने डॉक्टरांचे प्रयत्न यशस्वी ठरले. मुलाची प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. मुलाची बिघडत चाललेली प्रकृती स्थिर झाली. या मुलाची प्रकृती आधीपेक्षा बरीच सुधारली असून तो स्वतःहून जेऊ शकतो, असं डॉ. मंडल यांनी सांगितलं.
First published:

Tags: Bihar, Corona, Corona patient, Coronavirus, Coronavirus cases

पुढील बातम्या