सावधान! Corona रुग्णांमध्ये दिसते आहे केसगळती आणि झोप न लागण्याची समस्या, घाबरू नका!

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते.

करोनामधून (Coronavirus) बरं झाल्यानंतरही रुग्णांना अनेक समस्या जाणवत आहेत. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी रिकव्हरीला (Corona Recovery) वेळ लागत आहे.

  • Share this:
    दिल्ली, 16 जून: गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या लाटेचा (Corona Wave) सामना करत आहे. कोरोनाने जगात असंख्य बळी घेतले आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती देखील आहेत. कोरोनावर विविध उपचार पद्धती  आता उपलब्ध आहे. शिवाय कोरोनावर लसही (Corona Vaccination) बाजारात आलेली आहे, मात्र कोरोना सारख्या भयंकर आजारामधून (After Corona) बरं झाल्यानंतरही काही त्रास कोरोना रुग्णांमध्ये जाणवत आहेत. थकवा जाणवणं, अशक्तपणा,जेवण कमी होणं, केस गळणं, झोप न येणं या तक्रारी कोरोना रुग्ण करतात. कोरोनामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) कमी झालेली असते. पण या त्रासांमुळे घाबरून न जाता काही उपाय करता येऊ शकतात. आहाराकडे लक्ष द्या कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. त्याचवेळी तोंडाची चव गेल्यामुळे जेवण कमी झालेलं असतं. पण ही सगळी लक्षणं दिसत असताना घाबरू नका. काही छोटे उपाय करून देखील आपण त्यातून बाहेर पडू शकतो. कोरोना रिकव्हरीमध्ये आहार सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे आहारात प्रोटीनयुक्त आणि कार्बोहाइड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करा. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण या वेळी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच भरपूर पाणी प्या. हिरव्या पालेभाज्या, फळ यामधून व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला मिळतात. (जिममध्ये न जाता करा कार्डिओ वर्कआऊट; जाणून घ्या योग्य पद्धत) व्यायाम कोरोनामधून बरं झाल्यानंतर लगेच व्यायामला सुरूवात करू नका. शरीर अशक्त असल्यामुळे जास्त व्यायाम झेपणार नाही. त्यामुळे सुरुवातीला झेपेल असा व्यायाम करा. व्यायामाची सुरुवात करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुरुवातीला योगासनं आणि वॉक करायला सुरूवात कारा. जिममध्ये वर्काऊट करायची सवय असली तरी लगेच सुरुवात करू नका. (कोरोनावर भारी पडणार पुणेरी मास्क; संपर्कात येताच करणार व्हायरसचा नाश) केस गळणे कोरोना बरा झाल्यानंतर केस गळतीची समस्या सगळ्यांमध्ये दिसून आलेली आहे. कोरोना झाल्यानंतर मनावर ताण वाढल्यामुळे केस गळण्याचा त्रास दिसून येतो असं तज्ज्ञांचं मत आहे, त्याशिवाय जास्त प्रमाणामध्ये औषधं घेतल्यामुळे देखील केस गळू शकतात. कोरोना रिकव्हरीनंतर 3 ते 4 महिने केस गळती होऊ शकते. त्यापेक्षा जास्त दिवस केसगळती सुरू असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.  याशिवाय प्रोटीनयुक्त पदार्थ खायला सुरुवात करा. प्रोटीनयुक्त पदार्थांमुळे तणाव कमी होतो आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी देखील प्रोटीन फायदेशीर आहे. सोबत योगासन आणि व्यायामाने देखील फायदा होईल. (फक्त स्टेरॉइड्स नाही तर काढ्यामुळेही फंगल इन्फेक्शनचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध) झोप उडणे कोरोना बरा झाला तरी अनेकजणांना अनिद्रेचा त्रास होतो. याशिवाय एन्झायटी आणि डिप्रेशनही वाढतं. त्यामुळे झोप कमी येणं ही तक्रार कोरोना रुग्ण करतात. सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणं, चिडचिडेपणा होतो. कोरोना काळात मनात कोरोनाची भीती यामुळे दबाव आणि टेन्शन वाढतं. जास्त दिवसं आयसोलेशन मध्ये राहिल्याने एकटेपणाची भावना येते. रुग्णालयामध्ये ऍडमिट असताना दिवसाही झोप येते. त्यामुळे झोपेचं टाईमटेबल बिघडतं. यामुळे त्रास होतो असं डॉक्टरांचे म्हणणं आहे. डॉक्टरांच्यामते या काळामध्ये मन जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सोशल मीडियापासून दूर राहावं. सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्यांनी मनामध्ये निगेटिव्ह विचार वाढतात. याशिवाय कॅफीन असणारे पदार्थ खाऊ नयेत. दररोज व्यायाम आणि वॉक करा. बॅड टाईम रुटीन बनवल्यानेही फायदा होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published: