मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रसिद्ध कंडोम निर्माता कंपनीचं कोरोनामुळे निघालं दिवाळं, सेलमध्ये मोठी घट, समोर आलं विचित्र कारण

प्रसिद्ध कंडोम निर्माता कंपनीचं कोरोनामुळे निघालं दिवाळं, सेलमध्ये मोठी घट, समोर आलं विचित्र कारण

कोरोना महामारीच्या काळात लोकांनी शारीरिक संबंध ठेवले, मात्र कंडोमचा वापर केला नाही (Condom Use Decreased During Corona Pandemic). याच कारणामुळे कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांच्या व्यावसायात मोठी घट झाली.

कोरोना महामारीच्या काळात लोकांनी शारीरिक संबंध ठेवले, मात्र कंडोमचा वापर केला नाही (Condom Use Decreased During Corona Pandemic). याच कारणामुळे कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांच्या व्यावसायात मोठी घट झाली.

कोरोना महामारीच्या काळात लोकांनी शारीरिक संबंध ठेवले, मात्र कंडोमचा वापर केला नाही (Condom Use Decreased During Corona Pandemic). याच कारणामुळे कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांच्या व्यावसायात मोठी घट झाली.

नवी दिल्ली 11 जानेवारी : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे लोक घरांमध्येच अधिक वेळ घालवू लागले. यामुळे पती-पत्नी यांच्यातील जवळीक अधिक वाढली आणि अनेकांची सेक्स लाईफही (Lockdown Effect on Sex Life) आधीपेक्षा अतिशय चांगली झाली असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र, तरीही कंडोम इंडस्ट्रीला (Lockdown Effect on Condom Industry) मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. याचं कारण म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात लोकांनी शारीरिक संबंध ठेवले, मात्र कंडोमचा वापर केला नाही (Condom Use Decreased During Corona Pandemic). याच कारणामुळे कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांच्या व्यावसायात मोठी घट झाली.

नोकरी सोडून Adult Model बनली; VIDEO पाहिल्यानंतर आता फॅन्स करतायेत विचित्र मागणी

WION ने 'Nikkei Asia' च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात सांगितलं गेलं आहे, की कोरोना महामारीच्या काळात कंडोमचा वापर अतिशय कमी झाला. या कारणामुळे जगातील सर्वात मोठी कंडोम निर्माती कंपनी Karex Bhd च्या सेलमध्ये जवळपास 40 टक्क्यांची घट झाली. Karex Bhd चे सीईओ Goh Miah Kait म्हणाले, की कोरोना महामारीच्या काळात कंडोमच्या सेलवर मोठा परिणाम झाला. याचं एक कारण हेदेखील आहे की कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सुविधांमध्ये न येणारे क्लिनिक, जसं की Sexual Wellness Centres बराच काळ बंद राहिले.

मलेशियाच्या या कंपनीच्या सीईओनं पुढे सांगितलं, की कंपनी आता मेडिकल ग्लव्स बनवण्याचा व्यावसाय सुरू करणार आहे. यावर्षीच्या मध्यापासूनच थायलंडमध्ये याचं उत्पादन सुरू केलं जाईल. महामारीच्या आधी ही कंपनी जगभरात विक्री होणाऱ्या प्रत्येक पाच कंडोममधील एक कंडोम बनवत असे आणि याची वाढ डबल डिजिटमध्ये पोहोचली होती. 140 देशांमध्ये कंडोम एक्सपोर्ट करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन वर्षात 18 टक्क्यांची घट झाली आहे.

लहान वयाच्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास महिला का होतात तयार? जाणून घ्या कारण

एका रिसर्चमध्ये सांगितलं गेलं की विकसनशील देशांतील तरुण मुलींना कंडोमसारखे विश्वसनीय गर्भनिरोधक मिळवून देण्यात मदत केली गेली तर दरवर्षी सहा दशलक्ष अवांछित गर्भधारणा आणि दोन दशलक्ष असुरक्षित गर्भपात टाळता येऊ शकतात. विशेष म्हणजे, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स सारख्या गंभीर आजाराचा धोका असतो. असं असूनही मोठ्या संख्येने लोक अजूनही कंडोम वापरण्यास टाळाटाळ करतात.

First published:

Tags: Coronavirus, Sexual wellness