कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?

कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?

कोरोनाच्या परिस्थितीने आता रात्री झोपेत पडणाऱ्या स्वप्नांवरही (dreams) ताबा मिळवला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर :  "माझ्या स्वप्नात रात्री लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटातील राक्षस येत होते. एखाद्याला वाचवण्यासाठी मी आणि माझे मित्र त्या राक्षशांसी लढत होतो. हे सर्व काय होतं आहे मला काहीच समजतच नव्हतं". 27 वर्षांचा झिशान खान याचा हा कोरोना (coronavrius) लॉकडाऊनदरम्यानचा अनुभव. मार्चमध्ये तो कामानिमित्त बंगळुरूमध्ये आला. सुरुवातीला त्याला त्याच्या झोपेत कोणताच बदल जाणवला नाही. मात्र जसजसा लॉकडाऊनचा (lockdown) कालावधी वाढला तसतसं दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात त्याला प्रचंड एकटेपणा जाणवू लागला. त्याच्या झोपेवर आणि स्वप्नांवरही (dream) परिणाम होऊ लागला.

झिशानला अशी स्वप्नं पडल्यानंतर त्याला झोपेतून जाग यायची. मात्र तो पुन्हा झोपल्यानंतर त्याला दुसरं स्वप्नं नाही तर आधीचंच स्वप्नं जिथं थांबलं होतं, तिथूनच पुढे सुरू व्हायचं. फक्त झिशान नाही तर अशी अवस्था बऱ्याच जणांची झाली आहे. कोरोनाच्या या महामारीत तणावात प्रचंड वाढ झाल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. आता या तणावाचा स्वप्नांवर परिणाम होत असल्याच काही अभ्यासात निदर्शनास आलं आहे. लॉकडाऊनचा काळ, एकटेपणा, या सर्वांचा मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं दिसतं.  महामाथीच्या संकटात लोक अगदी भयानक स्वप्नांचा अनुभव घेत आहेत, ज्याला 'पँडेमिक ड्रिम्स' म्हणता येईल असं अभ्यासकांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा उद्रेक त्यानंतरचा लॉकडाऊन आणि या दरम्यान लोकांच्या स्वप्नांबाबत माहिती मिळविण्यासाठी हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डीअरड्रे बॅरेट यांनी ऑनलाइन सर्वेक्षण केलं.  मेपर्यंत 25000 व्यक्ती सर्वेक्षणात सहभागी झाल्या आहे. त्यापैकी सहा हजार बॅरेट यांनी विश्लेषण केलं. ही स्वप्नं लॉकडाऊन, कोरोनाचा उद्रेक यांच्याशी संबंधित असल्याचं बॅरेट यांनी हॉवर्ड गॅझेटला सांगितलं. बॅरेट यांच्या म्हणण्यानुसार स्वप्नातील रुपकांमध्येही कोरोना विषाणूची पार्श्वभूमी अनेकांना दिसत आहे. जगभर कोरोनाचा भीषण कहर पसरला आहे आणि जीवाची भीती निर्माण झाली आहे, आपल्याला तुरुंगात टाकलं आहे, किड्यांच्या समूहांनी आपल्यावर हल्ला केला आहे,  अशी भीतीदायक स्वप्न पडल्यांचं लोकांनी सांगितलं आहे.

हे वाचा - कोरोना रुग्ण बरे झाले पण...; डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांबाबत चिंताजनक माहिती समोर

तज्ज्ञांच्या मते जी काही वाईट स्वप्नं येतात त्याला मुख्य कारण तणाव आहे. आपण जेव्हा झोपतो आणि स्वप्न बघतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं.  2020 मध्ये तणावाचा स्तर हा सामान्य राहिलेला नाही.  सोशल डिस्टन्सिंग आणि आयसोलेशमुळे ताण प्रचंड वाढला आहे, असं हेल्थ रिसर्चर रूचिता चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. तणावात झोप न येणं, रात्री अचानक जाग येणं, कोरोनाचा अधिकाधिक फैलाव होतो अशी स्वप्न पडणं त्यामुळे  परिस्थिती अधिक आव्हानात्मक बनत असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं. महासाथीमुळे जो मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे तो कुठपर्यंत राहिल हे सांगणं कठीण असल्याचं त्या म्हणतात. मात्र दीर्घकाळ तणाव हा धोकादायकच असू शकतो नैराश्य, सामाजिक चिंता, चिंतेत वाढ होण्याचा धोका यातून असून त्याचा प्रभाव आपल्या स्वप्नांवर पडू शकतो, असं त्या म्हणतात.

भूतकाळातील त्रासदायक घटनांकडे पाहता आपल्या झोपेमध्ये तणाव कसा निर्माण होतो आणि मानसिक आघात कसा होतो याची कल्पना येते. विशेष म्हणजे अमेरिकेला हादरवणाऱ्या 11 नोव्हेंबर 2001 च्या  दहशतवादी हल्ल्यांचं विश्लेषण करताना एका अभ्यासात असं दिसून आलं की या नंतरच्या काळात स्वप्नांमध्ये निरीक्षणात्मक बदल समोर आलं होते. 'ए सिस्टिमॅटिक चेंज इन ड्रिम्स' या नावाच्या अभ्यासात 45 जणांच्या 20 स्वप्नांची लेखी माहिती सादर घेण्यात आली होती. यांची 10 स्वप्नं 9 /11  च्या हल्ल्याआधीची आणि इतर 10 स्वप्नं हल्ल्यानंतरची होती. या अभ्यासात असं दिसून आले की, 9/11 नंतरच्या लोकांना भयानक स्वप्नं पडू लागली. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 1989 मध्ये झालेल्या लोमा प्रीता भूकंपातील दुष्परिणामांचे मूल्यांकन करताना आणखी एक अभ्यास केला गेला की, त्यावेळीदेखील भूकंपांची स्वप्नं पडू लागली.

हे वाचा - राज्यातील कोरोना रिकव्हरी रेटमुळे दिलासा; पण नव्या संशोधनानं पुन्हा वाढली चिंता

मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सत्य प्रकाश म्हणाले, "सामाजिक पुनर्वसन आणि अधिक स्वप्नं पाहणं यामधील संबंध दर्शवणारे सैद्धांतिक पुरावे उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे कोरोनाच्या काळात सामान्य मानसिक आरोग्य बिघडलं आहे. आपण जगू आणि जग टिकेल याची खात्रीच उरलेली नाही. मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू, नोकऱ्या जाणं या विचारांमुळे चिंतेची पातळी प्रचंड वाढली असून यामुळे नकारात्मक विचारांची स्वप्नंही वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.  लॉकडाऊनमध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्यानं त्याचा झोपेवर परिणाम झाला"

"सोप्या भाषेत सांगायचं तर आरईएम झोपेचा एक टप्पा आहे जो  स्पष्ट स्वप्नांशी जोडलेला असतो. या टप्प्यात स्मृती आणि मन:स्थिती यांची महत्त्वाची भूमिका असते, असा विचार जेवढे जास्त काळ टिकतात, स्वप्ने तेवढी असतात. पण या स्वप्नांना थांबवण्यासाठी आणि शांत झोपेसाठी काय करायचं हा प्रश्न आहेच. कोरोना साथीची स्वप्नं नष्ट करणं शक्य नाही़. पण व्यायामामुळे झोपेचा वेळ वाढवू शकतो. त्यामुळे अशी नकारात्मक स्वप्नंदेखील कमी होतील आणि दुसऱ्या दिवशी ताजंतवानं वाटेल. व्यायाम करण्याबरोबरच सोशल मीडियापासून दूर राहणंही गरजेचं आहे.  या कोरोनाच्या महासाथीत जीवनावर विपरित परिणाम झाला आहे, जीवनशैली बदलली आहे.  त्यामुळे मानसिकतेवर नकारात्मक परिणाम जाणवत असून यासाठी बातम्या, सोशल मीडिया यापासून जेवढं दूर राहाल तेवढं बरं", असा सल्ला चंद्रशेखर यांनी दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: October 20, 2020, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading