मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss साठी आवडीने खाता Cornflakes.. पण याने खरंच वजन कमी होतं का?

Weight Loss साठी आवडीने खाता Cornflakes.. पण याने खरंच वजन कमी होतं का?

अनेक जाहिरातींमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला कोर्नफ्लेक्सविषयी कळतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हल्ली लोकांचा सर्वात लोकप्रिय नाश्ता कॉर्नफ्लेक्स बनत चालला आहे. मात्र याने वजन कमी होतं का?

अनेक जाहिरातींमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला कोर्नफ्लेक्सविषयी कळतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हल्ली लोकांचा सर्वात लोकप्रिय नाश्ता कॉर्नफ्लेक्स बनत चालला आहे. मात्र याने वजन कमी होतं का?

अनेक जाहिरातींमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला कोर्नफ्लेक्सविषयी कळतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हल्ली लोकांचा सर्वात लोकप्रिय नाश्ता कॉर्नफ्लेक्स बनत चालला आहे. मात्र याने वजन कमी होतं का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 नोव्हेंबर : जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा डॉक्टर आणि पोषणतज्ञ एकमताने मान्य करतात की, नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तुम्ही कितीही व्यस्त असलात, कितीही उशीरा उठलात तरी नाश्ता कधीही वगळू नये. नाश्त्याबद्दल बोललेlatikaलं की, लोकांना पोहे, उपमा या गोष्टी तर आठवतात. मात्र या पदार्थांनी वजन कमी होत नाही.

मग आपल्या डोक्यात विचार येतो की, वजन कमी होईल असा एखादा पदार्थ खावा. यापेक्षा उत्तम पर्याय काय असा विचार करताना, अनेक जाहिरातींमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला कोर्नफ्लेक्सविषयी कळतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. हल्ली लोकांचा सर्वात लोकप्रिय नाश्ता कॉर्नफ्लेक्स बनत चालला आहे. मात्र याने वजन कमी होतं का? चला जाणून घेऊया.

Skipping Breakfast : वजन कमी करण्यासाठी नाश्ता बंद करण्याचा विचार करताय? पाहा काय आहे तज्ज्ञांचं मत

कॉर्नफ्लेक्स बनवायला जितके सोपे तितकेच ते पटकन खंतही येतात. तसेच यामध्ये कॅलरी कमी असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नाश्त्याची लोकप्रियता वाढत असली तरी कॉर्नफ्लेक्स पौष्टिक आहे का? कारण नाश्ता म्हणजे महत्त्वाचे असल्याने पोषणतज्ञ पौष्टिक नाश्ता खाण्यावर भर देतात. जे आपल्याला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देते.

परंतु पोषणतज्ञांच्या मते, कॉर्नफ्लेक्समध्ये उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप असते त्यामुळे कॉर्नफ्लेक्सचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो यासोबतच कॉर्नफ्लेक्स खाताना दूध, फळे, ड्रायफ्रूट्स मिसळले जातात त्यामुळे एनर्जी असली तरी रोज कॉर्नफ्लेक्स खाऊ नये, असे आहारतज्ज्ञ सांगतात. कोणत्याही पॅकेज केलेल्या अन्नाप्रमाणे, कॉर्नफ्लेक्समध्ये ऍडेड शुगर असते. त्यामुळे रोज कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते, त्याचप्रमाणे वजनही कमी होण्याऐवजी वाढू शकते.

तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!

जर तुम्हाला रोज कढधान्यांचा नाश्ता बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लेक्सऐवजी ओट्स किंवा म्यूसली खाऊ शकता. ज्यात साखरेचे प्रमाण कमी असते. कारण कॉर्नफ्लेक्स हे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय वाटत असले तरी ते फारसे आरोग्यदायी नसतात. केवळ कॉर्नफ्लेक्समध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे म्हणून ते खाण्यासाठी पौष्टिक आहेतच असे नाही.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips