मुंबई, 08 नोव्हेंबर : न्याहारी हे दिवसाचे पहिले जेवण आहे. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपल्या शरीराला उर्जेची आवश्यकता असते, जी पौष्टिक निरोगी नाश्त्याद्वारे मिळते. मात्र सध्याच्या धावपळीच्या काळात लोक अनेकदा दिवसातील सर्वात महत्वाचे अन्न म्हणजेच नाश्ता वगळतात. 12 तासांपेक्षा जास्त वेळेच्या अंतराने जेवण केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नाश्ता न करण्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम त्यांनी नुकतीच 'Should I Skip...' अशी एक सिरीज सुरु केली आहे. त्यातीलच should इ skip breakfast या भागामध्ये त्यांनी नाष्टाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर तुम्ही स्वतःसाठी अनेक समस्यांना आमंत्रण देत आहात. सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा आहे. जे लोक न्याहारी करतात त्यांना रात्री फार अन्न खावेसे वाटत नाही.
Side Effects of Cucumber : यावेळी चुकूनही खाऊ नका काकडी, फायद्याऐवजी होईल नुकसान
नाश्ता करण्याचे फायदे
रुजुता यांनी सांगितले की, जे लोक नियमितपणे सकाळचा नाश्ता करतात, त्यांचा मेंदू नाश्त्याकडे लक्ष न देणाऱ्यांपेक्षा अधिक प्रभावीपणे काम करतो. यासोबतच नियमित नाश्ता केल्याने हृदयाच्या समस्या उद्भवत नाहीत, चयापचय संतुलित राहते, वजन निरोगी राहते, दिवसभर शरीरात ऊर्जा राहते, तसेच मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम
तुम्ही दररोज नाश्ता ना केल्यास तुम्हाला ऍसिडिटी, शारीवर सूज, एन्गझायटी, डोकेदुखी, मायग्रेन, अनियमित मासिक पाळी, व्हिटॅमिन बी 12 आणि डीची कमतरता, प्रोटीन कमतरता असे अनेक त्रास होऊ शकतात.
या लोकांनी कधीही नाश्ता स्किप करू नये
असे लोक एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा मोठ्या प्रोजेक्टसाठी काम करत आहेत, अशा लोकांनी नाश्ता अजिबात वगळू नये. याशिवाय रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजच्या काळात आणि गर्भवती महिला, खेळाडू, जुनाट आजाराच्या रुग्णांनी नियमित नाश्ता करणे अत्यंत आवश्यक आहे.
View this post on Instagram
सकाळी नाश्ता करण्यासोबतच तुम्ही काय खात आहात हे देखील महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत हवाबंद पॅकेज्ड पदार्थ अजिबात खाऊ नये. त्याऐवजी घरच्या घरी ताजा नाश्ता करा. नाश्ता करायला वेळ नसेल तर ड्राय फ्रुट्स खाणेही फायदेशीर ठरते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight, Weight loss